पुणे- परप्रांतातून महाराष्ट्रात आलेली १८ ते २० वर्षे दरम्यानची ९ पोरे जमा झाली , हत्यारे घेऊनच ती आली, वाकडेवाडी येथील जुना-पुणे मुंबई हायवे रोडवरील अंडर पास ब्रिजखालील फुटपाथवर जमा होऊन तेथून वाकडेवाडीच्या भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यास निघाली खरी ..पण पुण्याच्या पोलिसांनी झडप घातली आणि या ९ जणांच्या टोळीला पकडून गजाआड केली .
या प्रकरणी खडकी पोलीस ठाणे येथील पोलीस अंमलदार सुधाकर राठोड यांनी फिर्याद नोंदविली आहे. पकडलेल्या तरुण आरोपींची नावे १) अभिषेक राजकुमार महतो, वय २२ वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळगाव बेटिया थाना अहमदाबाद, जि. कटियारा बिहार २) दिनेश राजकुमार नोनिया, वय १८ वर्षे रा. पुणे फिरस्ता, मुळगाव बेटियाथाना अहमदाबाद, जि. कटियारा बिहार ३) रोहनकुमार विलोप्रसाद चौरोसिया, वय १९ वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळगाव मु. नयाइला, तिलझारी, महाराजपुर, जि. साहेबगंज, राज्य झारखंड ४) राजेश धर्मपाल नोनियाँ, वय १८ वर्षे, रा. पुणे फिरस्ता, मुळगाव ढामरा कोलीयरी पत्थरखदान, पो. काली पबाडी, राणीगंज, जि बर्धमान, पश्चिम बंगाल ५) सचिन सुखदेव कुमार, वय २० वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळगाव ग्राम नयाटोला, कल्याणी, महाराजपुर बाजार, तिलझारी, महाराजपुर, जिल्हा साहेबगंज, राज्यझारखंड ६) उजीर सलीम शेख, वय १९ वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळ गाव बेटियाथाना अहमदाबाद, जि कटियारा बिहार ७) अमिर नुर शेख वय १९ वर्षे रा. झारखंड ८) सुमित मुन्ना महातोकुमार वय १९ वर्षे रा. झारखंड ९) कुणाल रतन महातो वय २१ वर्षे रा. जि कटियारा बिहार अशी आहेत. दि.१५/०४/२०२५ रोजी रात्रौ २३/४५ वा.चे सुमा, वाकडेवाडी, जुना-पुणे मुंबई हायवे रोडवरील अंडर पास ब्रिजखालील अंडर पास फुटपाथ रस्त्यावर अंधारात वाकडेवाडी येथे हे हे सर्व आपले कब्जात बेकायदेशीररित्या व अनधिकृतपणे घातक शस्त्रे आपले जवळ बाळगुन, हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, वाकडेवाडी पुणे येथील भारत पेट्रोलपंप येथे दरोडा टाकण्यासाठी व स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी दरोडा टाकण्याचे तयारीत असताना हाती लागल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले मो. नं.९६५७९९०६०६ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

