पुणे- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ऋचा इंजिनीरिंग टूल टेक टूलिंग प्रा.ली. छत्रपती संभाजी नगर ला भेट दिली. या भेटी दरम्यान ऋचा इंजिनिअर्सच्या तांत्रिक टीमने विद्यार्थ्यांनी आधुनिक उत्पादन प्रणाली, ऑटोमेशन, अभियांत्रिकी-केंद्रित औद्योगिक उत्पादनांचे डिझाइनिंग, प्रेस पार्ट्स, स्ट्रक्चरल एलिमेंट्स, ट्रान्समिशन सिस्टम्स, एक्झॉस्ट सिस्टम्स, इंजिनशी संबंधित असेंब्ली आणि प्लास्टिक मोल्डेड पार्ट्स, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा या विषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला भेट देऊन न्यायालयीन कामकाजाचे थेट निरीक्षण केले आणि प्रशासन आणि औद्योगिक नियमनात न्यायव्यवस्थेची भूमिका जाणून घेतली. या अभ्यास सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ.रमा गायकवाड यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा.संभाजी नवले यांनी काम पहिले. या अभ्यास सहलीमध्ये डॉ.रमा गायकवाड, डॉ.प्रांजली मोरे, डॉ.जितेंद्र मुसळे, प्रा.देवेंद्र भारंबे, प्रा. प्रांजळ मोरे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या औद्योगिक अभ्यस सहलीत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा, औद्योगिक कामाचा जवळून अनुभव घेता आल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाने औद्योगिक अभ्यस सहलीचे आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिलाताई गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
अनंतराव पवार अभियांत्रिकीची औद्योगिक अभ्यास सहल संपन्न…
Date:

