पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री.दीपक मानकर यांनी ससून हॉस्पिटलजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.चेतन तुपे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेबांच्या समता आणि बंधुत्वाच्या मार्गाने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांना मानवंदना देऊन डॉ.बाबासाहेबांनी भारतीय संविधानाद्वारे जो विचार मांडला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशात लोकशाहीचे अस्तित्व टिकून आहे. या खास प्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणी वाटप, स्वच्छता मोहीम सारखे अनोखे उपक्रम राबवले त्याबद्दल प्रदीप पवार, राहुल तांबे यांच्यासह पुणे कॅन्टोन्मेंट मधील पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच ‘एकता मिसळ’तर्फे उपस्थितांना मिसळ वाटण्याचा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्याबद्दल प्रशासन आणि सर्व आयोजकांचे आभार मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केलेल्या सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदरप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसरचे आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मा.नगरसेवक शांतीलाल मिसाळ, आर पी आय प्रदेश सदस्य ॲड.मंदार जोशी,विधानसभा अध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट नरेश जाधव, पर्वती संतोष नांगरे, हडपसर शंतनू जगदाळे, पुणे कॅन्टोन्मेंट महिला अध्यक्ष नीता गायकवाड, ओ.बी.सी. सेल अध्यक्ष हरीश लडकत, व्यापारी सेल अध्यक्ष वीरेंद्र किराड, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, तृतीयपंथी सेल अध्यक्ष निर्जला गायकवाड, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, डिंपल इंगळे, दिलीप जांभूळकर, हनीफ शेख, संघटक सचिव नईम शेख, भारत पंजाबी, रविंद्र कवडे, चिटणीस चेतन मोरे, शाम शेळके, पंडित जगताप, दिनेश परदेशी, दिनेश अर्दाळकर,महेंद्र लालबिगे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा कार्याध्यक्ष राहुल तांबे, गोरखनाथ भिकुले, हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष अमर तुपे, संदिपनाना बधे, योगेश वराडे, ॲड.अर्चिता मंदार जोशी,महिला उपाध्यक्ष सुनिता चव्हाण, संघटक सचिव प्रीती डोंगरे, चिटणीस सुनिता बडेकर,युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, उपाध्यक्ष स्नेहल कांबळे,शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, पुणे कॅन्टोन्मेंट सामाजिक न्याय अध्यक्ष अतुल जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्ष अर्चना वाघमारे, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष प्रविण पवार, प्रज्ञा वाघमारे,वर्षा गावडे, संतोष हत्ते यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक,अनुयायी उपस्थित होते.