बापरे भाजपाला तब्बल 2243 कोटीची देणगी म्हणजे 88% रक्कम एकट्या भाजपाच्या वाट्याला! मग पैशावरच्या निवडणुका या एकतर्फीच होणार! : आम आदमी पार्टी

Date:

पुणे- ८८ टक्के राजकीय देणगी रक्कम एकट्या भाजपकडे असेल आणि तीही प्रामुख्याने मोठ्या भांडवलदारांकडून मिळाली असेल तर या निवडणुका न्यायपूर्ण रास्त कशा होणार असा प्रश्न आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे कि,’निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि मुख्यत्वे वीस हजार पेक्षा अधिक रकमेच्या डोनेशनची जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून एडीआर या संस्थेने त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार २०२३- २४ सालात भाजपला २२४३ कोटी रक्कम मिळाली तर काँग्रेसला याच काळामध्ये २८१ कोटी तर आम आदमी पार्टीला केवळ ११ कोटी रक्कम मिळाल्याचे दिसते.

भाजपला या आधीच्या वर्षी ७१९ कोटी मिळाले होते तिथपासून ही २२४३ कोटी एवढी मोठी उडी भाजपने मारली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रोरल बाँड याचा सहभाग असणार आणि सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी २०२४ मध्ये इलेक्ट्रोरल बाँड बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. अर्थात त्या देणगीदारांची चौकशी मात्र झाली नाही. परंतु इलेक्टोरल बाँड चा उपयोग मुख्यत्वे भाजपलाच होत होता. याचे कारणही उघड आहे. त्यावरती सुप्रीम कोर्टाने पण शंका उपस्थित केली होतीच. काही कंत्राटी डोनेशन्स याचा संबंध स्पष्टपणे अधोरेखित करता येतो असे अनेक पत्रकारांनी पुढे आणलेपण होते.
यात भाजपाच्या तुलनेने काँग्रेसही खूप मागे दिसतो तर आम आदमी पार्टी त्यांच्या देणगीच्या एक टक्के सुद्धा रक्कम मिळूवू शकली नाही हे दिसतेच आहे. तरीही दिल्ली पंजाब अशा ठिकाणी आम आदमी पार्टीने जबरदस्त लढत दिली.

यातून पुढे येणारा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे या डोनेशन देणाऱ्यांची संख्या! या अहवालाप्रमाणे भाजपला २२४३ कोटी रक्कम ८३५८ देणगीदारांकडून मिळाली तर आम आदमी पार्टीला ११ कोटी रक्कम ही १६७१ देणगीदारांकडून मिळाली. याचा अर्थ भाजपला सरासरी एका देणगीदाराकडून २६ लाख रुपये मिळाले तर आम आदमी पार्टीला ६५ हजार रु देणगीदारामागे मिळाले. यावरून भाजपला देणारे हे अदानी अंबानी या भांडवलदार/ व्यावसायिक वर्गातील (८९%) आहेत हे उघड आहे तर आम आदमी पार्टीला देणगी देणारा हा मुख्यत्वे वैयक्तिक देणगीदार आहे हे लक्षात येते. त्यामुळेच भाजपची धोरणे अदानी सारख्यांच्या सोयीची का असतात हेही उघड होते असा आरोप आपचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

भाजपला देणगी देणाऱ्यांमध्ये इलेक्टोरल ट्रस्ट सोबत एसीएमई सोलर एनर्जी (पवनचक्की), रुंगटा सन्स (खाण उद्योग (,भारत बायोटेक (वॅक्सिन), आयटीसी इन्फोटेक अशा कंपन्या आहेत. साधारणपणे या कंपन्यांनी प्रत्येकी ५०- ८० कोटी रक्कम दिलेली आहे. त्याचा संबंध त्यांना मिळालेल्या कंत्राटांशी कसा आहे हे पहावे लागेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...