कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : प.पू. योगाभ्यानंद माधवनाथ महाराज यांच्या पादुका पूजन व दर्शन सोहळा बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घेतले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, योगाभ्यानंद माधवनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय नामजोशी, नीलिमा नामजोशी यांचा यावेळी ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला. तर, माध्यान्ह आरती मृणालिनी हेमंत रासने यांच्या हस्ते झाली. माधवनाथ महाराज हे श्रीमंत दगडूशेठ व श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे अध्यात्मिक गुरु होते. त्यांच्या पादुका इंदौर येथून पुण्यात आल्या असून दत्तमंदिरात पूजनासाठी व दर्शनासाठी आल्या होत्या.

