पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषेदेच्या अनंतराव पवार अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, पुणे (APCOER) येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (ACT) विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात, प्रा. भगवान दिनकर थोरात (सहाय्यक प्राध्यापक, AI&DS विभाग, VIT पुणे) यांनी “ओब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग (OOP)” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान दिले.या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांसोबतच प्रत्यक्ष प्रोग्रॅमिंगमधील अनुभवात्मक दृष्टिकोन मिळाला प्रा. थोरात यांनी ओओपीमधील मूलभूत तत्त्वे, कोड पुर्नवापर (code reusability) आणि सॉफ्टवेअर डिझाईनच्या मुद्द्यांवर प्रगल्भ व सुसंगत मार्गदर्शन केले. शैक्षणिक आणि उद्योगस्नेही उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार होऊन विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे तर उद्याच्या डिजिटल जगात काहीतरी नाविन्यपूर्ण घडवण्यासाठी व विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवाद साधता यावा यासाठी असे उपक्रम राबवले जातात. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये ओओपी विषयीची समज अधिक प्रगल्भ झाली. या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. स्वाती गांधी विभागप्रमुख इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी यांनी केले. तर व्याख्यानाचे समन्वयक म्हणून डॉ. डॉ.हृषीकेश वंजारी यांनी काम पहिले.
या कार्यक्रमासाठी प्रा. भगवान दिनकर थोरात, डॉ. स्वाती गांधी, डॉ.हृषीकेश वंजारी, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाने या नवीन विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल्याबदल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषेदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

