तहव्वूर राणाला भारतात आणाण्यासाठी 15 वर्षे का लागली? मुंबईत राजकारण करत पुन्हा मतांची पोळी शेकण्यासाठी उपयोग करतील
मुंबई-
अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांचा दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो बीडच्या भाषणातही त्यांनी केला आहे. पुण्याई कोणाची तर आई-वडीलांची आणि चुलत्याची असे ते बोलले आहेत म्हणजे स्पष्ट आहे की, अजितदादांवर काकांची पुण्याई आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, तहव्वूर राणाला भारतात आणाण्यासाठी 15 वर्षे का लागली, याचे उत्तर कोण देणार. बरोबर मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्याचा मुंबईत उपयोग करतील. राजकारण करत पुन्हा मतांची पोळी शेकली जाणार, ते करू नका राणाला फाशी द्या, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे. हिंदू-मुस्लीम करत हमने बहोत कुछ किया असे सांगितले जाईल.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, परिस्थितीनुसार सर्वच जण बदलत आहे. अनेकांना बदलावे लागते. आता भाजपसोबत असलेली मंडळी 3 वर्षांनंतर कुठे दिसतील, पुढची निवडणूक कुणासोबत लढवतील, याचा अंदाज हळूहळू यांना येऊ लागला आहे.
अजित पवार म्हणाले की, आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवे. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला, असे म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे कारणही सांगितले.दरम्यान, यापूर्वीही अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना एका भाषणामध्ये शरद पवारांबाबत विधान केले होते. त्यावेळी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतिचिन्ह न आणण्याची विनंती केली होती. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले असल्याचे ते यासंबंधी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली होती.

