Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

120 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना स्वतःच्या मोबाईल ओळखीवर मिळणार नियंत्रण आणि सुरक्षा

Date:

नागरिकांच्या तक्रारीनंतर जवळपास 30 लाख मोबाईल उपकरणे वापरासाठी प्रतिबंधित अर्थात ब्लॉक

संचारसाथीच्या माध्यमातून दूरसंचार ग्राहकांना फसवणुकीपासून अधिक सुरक्षा मिळणार, हरवलेल्या मोबाईल उपकरणाची तक्रार आणि शोध घेणेही झाले सोपे

सुमारे 18 लाख हरवलेली / चोरीला गेलली मोबाईल उपकरणे यशस्वीरित्या शोधून वापरकर्तांना परत दिली

बनावट फोन कॉल्सना प्रतिबंध, संचारसाथीच्या माध्यमातून करता येणार तक्रार, विभागही तातडीने कारवाई करणार

नवी दिल्‍ली, 9 एप्रिल 2025

केंद्रीय दूरसंचार विभागाच्या  (Department of Telecommunications – DoT) संचारसाथी या अद्ययावत नागरिक – केंद्रित उपक्रम आहे. यामुळे देशातील 120 कोटीं पेक्षा जास्त दूरसंचार ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल ठरले आहे. या डिजीटल मंचाच्या माध्यमातून देशभरातील मोबाईल सेवा वापरकर्त्यांना त्यांच्या दूरसंचार जोडण्यांवर स्वतःचे अधिक नियंत्रण ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे, तसेच या ग्राहकांना फसवणूक आणि सुरक्षा धोक्यांविषयी सुलभतेने तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.  या माध्यमातून नागरिकांसाठी डिजिटल सुरक्षा अधिक बळकट झाली , पारदर्शकता वाढली आणि मोबाईल सेवा वापरकर्त्यांचे सक्षमीकरण होत आहे  असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.

प्राथमिक पातळीवर मे 2023 मध्ये संचारसाथी या उपक्रमाचा प्रारंभ केला गेला होता. या उपक्रमाअंतर्गत वापरकर्त्यांना त्यांना स्वतःच्या मोबाईल उपकरणाच्या ओळखीचे व्यवस्थापन करण्याची आणि या ओळखीच्या सुरक्षितेत उपयुक्त ठरणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिला गेला. यात तुमची मोबाईल जोडणी अर्थात कनेक्शन जाणून घ्या, आपले हरवले गेलेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल उपकरण ब्लॉक अर्थात वापरासाठी प्रतिबंधित करा, आणि आपल्या मोबाईल उपकरणाचा IMEI क्रमांक सत्यापित करा या प्रमुख सुविधांचा समावेश आहे.

याअंतर्गतच्या तुमची मोबाईल जोडणी अर्थात कनेक्शन जाणून घ्या या सेवेच्या माध्यमातून मोबाईल  वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल उपकरणाशी जोडलेल्या ओळख क्रमांकावर नोंदणीकृत सर्व मोबाईल क्रमांक तपासण्याची सुविधा मिळते. आपले हरवले गेलेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल उपकरण ब्लॉक अर्थात वापरासाठी प्रतिबंधित करा या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना विशिष्ट परिस्थितीत त्यांचे मोबाईल उपकरण तातडीने वापरासाठी प्रतिबंधित म्हणजेच ब्लॉक करता येते, त्याविषयी तक्रार दाखल करता येते आणि त्याचा माग काढून तो परत मिळवण्याच्या शक्यतेची संधीही उपलब्ध होते. यासोबतच आपल्या मोबाईल उपकरणाचा IMEI क्रमांक सत्यापित करा या सेवे अंतर्गत वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल उपकरणाच्या ओळखीशी संबंधित असलेला IMEI (International Mobile Equipment Identity) क्रमांक अर्थात आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांकांची सत्यता पडताळता पाहता येते.

या सुविधांच्या सोबतीनेच, संचारसाथी अंतर्गत वापरकर्त्यांसाठी चक्षु ही एक सहभागात्मक सुविधा देखील उपलब्ध करून दिली गेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश विषयी तसेच फसवणुकीच्या उद्देशाने अनपेक्षितपणे केला जाणारा व्यावसायिक संवाद (Unsolicited Commercial Communications – UCC) अथवा फसवणूक वा इतर कोणत्याही गुन्हेगारी उद्देशाने होत असलेली संवादाची प्रक्रिया आढळली तर ते त्याबाबतची तक्रार दाखल करू शकतात.

दूरसंचार विभागाला संचारसाथीच्या पोर्टलवर असंख्य तक्रारी प्राप्त होत असतात. यांपैकी एक महत्वाची तक्रार म्हणजे प्रत्यक्षात +91 हा भारताचा आंतरराष्ट्रीय दूरसंचार कोड असलेल्या परदेशातील क्रमांकावरून येत असलेले कॉल. अशा तऱ्हेने प्रत्यक्ष पदरदेशातून आलेले फोन कॉल हे भारतातील स्थानिक कॉल असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे. या फसव्या फोन कॉलसाठी वापरले जाणारे दूरध्वनी वा मोबाईल क्रमांक हे फिशिंग म्हणजेच आर्थिक फसवणूक वा इतर गुन्हेगारी स्वरुपाच्या उद्देशानेच केले गेलेले असतात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होत असतो. त्यामुळेच दूरसंचार विभागाने या समस्येला आपल्या प्राधान्यक्रमावर ठेवले आहे. त्यादृष्टीनेच आता नागरिकांना अशा फोन कॉल्सची तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर संबंधित पोलीस प्रशासनाच्या मदतीने दूरसंचार विभाग या प्रकरणांची कसून सखोल चौकशी करते आणि त्यानंतर हे फसवे कॉल करण्यासाठी स्थापन केलेली यंत्रणा आणि व्यवस्था तातडीने पूर्णतः बंद केली जाते.

संचारसाथीच्या छत्राअंतर्गतच वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिलेली एक उपयुक्त सेवा म्हणजे वायरलाइन इंटरनेट सेवा प्रदाते (ISPs) शोधा ही सेवा. या सेवेच्या माध्यमातून नागरिक आपल्या परिसरातील परवानाधारक इंटरनेट सेवा प्रदात्यांची माहिती एका क्लिकवर मिळवू शकतात. या सेवेमुळे नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य इंटरनेट सेवा सुलभतेने मिळवणे शक्य झाले आहे.

संचारसाथी या उपक्रमाला सुरुवातीपासूनच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, आणि दूरसंचार विभागानेही नागरिकांद्वारे प्राप्त झालेल्या विविध स्वरुपाच्या तक्रारींवर तितकीच प्रभावी कार्यवाही केली आहे. यातलेच काही उल्लेखनीय यश खाली मांडले आहे.

  • आत्तापर्यंत मोबाईल सिम कार्डांशी संबंधित 1.35 कोटीपेक्षा समस्या सोडवल्या गेल्या आहेत.
  • नागरिकांच्या तक्रारीनंतर जवळपास 30 लाख मोबाईल उपकरणे वापरासाठी प्रतिबंधित अर्थात  ब्लॉक करण्यात आले आहेत. यांपैकी सुमारे 18 लाख हरवलेली / चोरीला गेलली मोबाईल उपकरणे यशस्वीरित्या शोधून वापरकर्तांना परत दिली गेली आहेत.
  • फसवणूक, फसवणूकीच्या उद्देशाने केलेले व्यावसायिक फोन कॉल (UCC), तसेच गुन्हेगारी स्वरुपाच्या संशयास्पद कृतींशी संबंधित असलेले सुमारे 5.5 लाखांपेक्षा जास्त मोबाईल क्रमांकांवर  कारवाई केली गेली आहे.

देशातील मोबाईल सेवा वापरकर्त्यांच्या हिताच्या दृष्टीने संचारसाथीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूरसंचार विभागाने वेळोवेळी व्यापक जागरूकता मोहीमाही राबवल्या आहेत. परिणामी संचारसाथीच्या वापरकर्त्यांची संख्या आणि या उपक्रमाला मिळणारा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वापरकर्त्याच्या सोयीसाठी दूरसंचार विभागाने ही सेवा वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसारच अँड्रॉईड वापरकर्ते Google PlayStore वरून तर आयफोनचे वापरकर्ते iOS Store वरून या सेवेचे मोबाईल अॅप डाऊनलोड करून घेऊ शकतात, अथवा www.sancharsaathi.gov.in या अधिकृत पोर्टललाही भेट देऊ शकतात.

‘संचारसाथी’ च्या माध्यमातून भारत सरकार देशाच्या दूरसंचार परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि नागरिकांच्या सहभागातून डिजिटल सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...