पुणे-सध्या पुण्यात रहाणारी एक महिला तिच्या मुळ गाव बीड येथून पुण्यातील वाघाेली परिसरात सहा एप्रिल राेजी सायंकाळी साडेपाच वाजता आली हाेती. तेथून कॅबने ती वडगाव धायरी येथील राहते साेसायटीचे गेटवर आली असताना, तिचा दाेन अनाेळखी व्यक्तींनी तिचा चारचाकी गाडीतून वाघाेली येथून पाठलाग केला. साेसायटीचे गेटवर महिलेस अडवून बळजबरीने गाडीत बसवून तिला पळवून नेत तिच्याकडे खंडणीची मागणी करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला हाेता.याप्रकरणाची तक्रार सहकारनगर पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सदर गुन्हयाचा गांभीर्याने तपास करत दाेन आराेपींना गजाआड केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गाैड यांनी दिली आहे.
महेश माेहन रासकर (वय- 27) आणि किरण भाऊसाहेब ढगे (वय- 27, दाेघे रा. तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. आराेपींनी महिलेचे अपहरण करुन तिला गाडीत पळवून नेत असताना, तिच्या गालाला हात लावून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करत तिचा विनयभंग करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा माेबाईलचा पासवर्ड विचारुन, माेबाईलमधील फाेन पे खात्यावरुन 1400 रुपये एका दुकानदाराला ट्रान्सफर केले हाेते. त्यानंतर तिच्याकडून राेख रक्कम घेऊन आराेपी पसार झाले हाेते. या गुन्ह्याचा तपास सहकारनगर पोलिस करत असून त्यांना आराेपी महेश रासकर व किरण ढगे यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा शाेध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिसांनी सखाेल तपास केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आराेपीच्या ताब्यातून राेख स्वरुपात घेतलेले 1400 रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरलेली 4 लाख रुपये किंमतीची कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे.

