इसीए बेस फायनान्सिंगच्या भारतातल्या पहिल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा –
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोलाचे सहकार्य,
पुणे -संवेदनशील रेड झोन असताना तो ज्ञात करून न घेता वारजे हॉस्पिटल चे तत्कालीन काळात भूमिपूजन तर झाले पण पुढे सुरु झाला खरा खडतर प्रवास आणि तो नजरेच्या टप्प्यात आणून सरते कठीण आणि जाचक प्रवास पूर्ण करत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला रक्षा मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविले आहे आता या रुग्णालयाच्या बांधकामाला महापालिका कधीही प्रारंभ करू शकणार आहे. राजेंद्र भोसले यांच्या पुण्यातील महापालिकेच्या कारकिर्दीतील हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे .
महापालिकेचे वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावीत आहे, या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला होता, प्रत्यक्षात काम चालू करण्याच्या आधी या हॉस्पिटलच्या बांधकामाचा झोन हा रक्षा मंत्रालयाच्या अति संवेदनशील फनेल रेड क्षेत्रामध्ये येत होता, पालिकेला याबद्दलची कल्पना डॉ राजेंद्र भोसले रुजू झाल्यावर समजले आणि त्यामुळे काम चालू करायच्या आधी रक्षा मंत्रालयाची परवानगी मिळणे गरजेचे झाले होते, संवेदनशील रेड झोन पाहता त्याबद्दलची एनओसी रक्षा मंत्रालय कडून मिळणे फार किचकट व पाठपुराव्याचे काम होते, यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, लोहगाव एअरपोर्ट बेस पुणे, त्यानंतर गांधीनगर रक्षा मंत्रालय बेस गुजरात, आणि त्यानंतर सरते शेवटी दिल्ली रक्षा मंत्रालय असा कठीण आणि जाचक प्रवास होता, पण आता ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे, बांधकामाचा पुढील मार्ग मोकळा झालेला आहे,
पुणे महानगरपालिकेच्या, वारजे येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, एक वर्षापासूनच्या मेहनतीच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलेले आहे, नुकतीच या प्रकल्पाला रक्षा मंत्रालयाची एनओसी मिळाली, आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी स्वतः ही एनओसी लवकर कशी मिळवता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले होते, यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे योगदान मोलाचे ठरले व तसेचउपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजितदादा पवार,केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या पुढील टप्पा हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या विहित बांधकामाच्या परवानग्या आल्यावर या प्रकल्पाचे काम चालू होणार आहे, हा प्रकल्प साधारणपणे २०२७ ला पुणेकरांच्या सेवेत रुजू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असून, यामध्ये लागणारी संपूर्ण गुंतवणूक ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट धोरणाच्या अंतर्गत नेदरलँड येथील निम शासकीय संस्था करणार आहे, या संपूर्ण प्रकल्पाला नेदरलैंड येथील शासकीय संस्थेचा इन्शुरन्स मिळालेला आहे, या संपूर्ण प्रकल्पाचा ड्राफ्ट डीपीआर रक्षा मंत्रालयात देण्यात आला.
या हॉस्पिटलमध्ये विशेष भर हा कॅन्सर आणि मदर अँड चाइल्ड केअर यावर देण्यात असून, महाराष्ट्रातील मदर अँड चाइल्ड केअर चे हे सर्वात मोठे हॉस्पिटल राहणार आहे, या प्रकल्पामध्ये जवळपास दहा ते वीस टक्के बेड हे गरजूंना रिझर्व राहणार आहे, राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना, या प्रकल्पामध्ये राबवण्यात येणार आहेत, प्रकल्प चालू झाल्यावर दरवर्षी पालिकेला यामधून ठराविक उत्पन्न मिळणार आहे, संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत मिळाल्यानंतर आता सदर हॉस्पिटल ची जागा या प्रकल्पासाठी उपयोगात येणार आहे, आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी हा प्रकल्प करत असलेल्या रुलर एनान्सर्स या संस्थेने संरक्षण मंत्रालयाची आणि इतर परवानग्या येईपर्यंत सदर जागेतील डायलिसिस सेंटर रुग्णांना गैरसोय होऊ नये म्हणून कार्यान्वित ठेवले होते.
प्रकल्प चालू झाल्यापासून कार्यान्वयीत होईपर्यंत परदेशी गुंतवणूक करणाऱ्या एफडीआय संस्था पालिकेला जवळपास साडे सतरा कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणार आहे, तसेच हा प्रकल्प चालू झाल्यावर या संस्थेमार्फत पालिकेच्या माध्यमातून सुकाणू समिती या प्रकल्पावर देखरेख करेल, हा प्रकल्प आरोग्य व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातील मानांकित हॉस्पिटल म्हणून लोकांमध्ये ओळखल्या जाईल.या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा हॉस्पिटल प्रकल्प भारतातील पहिला इसीए फायनान्सिंग संकल्पनेवर आधारित असून, यानंतर महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यास फार मोठी मदत या माध्यमातून होणार आहे.

