पुणे- सेवेबद्दल आणि उपचार पद्धतीबाबत ख्यातनाम अशा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासन आणि सरकारी अधिकारी यांच्यातील बेपर्वाई आता तपासण्याची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागातील एका बड्या अधिकाऱ्याकडून आज पदभार काढून घेण्यात आला आहे मात्र दुसरीकडे महापालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांच्या बेपर्वाई बद्दल महापालिकेचे आरोग्य प्रमुख काय झोपले होते काय ? असा सवाल करत महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांची तातडीने उचलबांगडी झाली पाहिजे अशी मागणी आता करण्यात येऊ लागली आहे.
मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आता आरोग्य विभागात झाडाझडतीला सुरूवात झाली आहे. कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडील पदभार काढला आहे.
बबिता कमलापुरकर यांच्याकडे होता कुटुंब कल्याणचा अतिरीक्त पदभार होता. कुटुंब कल्याण विभागाकडे माता मृत्यु रोखण्याची मुख्य जबाबदारी असते त्यामुळे हा विभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. कमलापुरकर यांच्या जागी आता डॅाक्टर संदीप सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमालापुरकर यांच्याकडे आता फक्त पुण्याचा आरोग्य विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. सांगळे यांच्याकडेही अतिरिक्त पदभार महत्वाच्या पदावर पुर्णवेळ आधिकार्याची नियुक्ती केलेली नाही. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर कमलापुरकर यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडुन कारवाईला सुरवात झाल्याची चर्चा आहे.
दिनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा सोमवारी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. बालेवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भिसे कुटुंबियांनी भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे घैसास यांचे लायसन रद्द करण्याची देखील मागणी केली होती.

