‘सुशीला-सुजीत’ १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

Date:

पुणे, ता. ७: स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे, यामुळे चर्चेत असलेला बहुप्रतीक्षित ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट येत्या १८ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेल्या काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने प्रकाशित झालेल्या टीझर, पोस्टर, प्रसारगीत आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला असून, चित्रपट निखळ कौटुंबिक मनोरंजनाचा एक आगळा अविष्कार ठरणार आहे.

‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’च्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहेत. स्वप्नील आणि सोनाली एका घरात बंद दाराआड अडकून पडतात. त्यांचा मोबाईलसुद्धा बाहेर राहिला आहे. त्यांचे नाते काय आहे, त्यांचात संबंध काय आहे, अडकण्याचे कारण काय, हे प्रश्न रसिकांना पडले असले तरी त्यातून पडद्यावर धमाल पाहायला मिळणार याची हमी मात्र त्यांना मिळाली आहे. ट्रेलर, पोस्टर यातून  ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणिप्र साद ओक यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईत सर्व कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांनी एकत्र येत आगळा उत्सव साजरा केला होता. आता चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहिली जात असताना कलाकारांनी चित्रपटाचे विविध पैलू पत्रकारांसमोर उलगडले. निर्माती मंजिरी ओक, अभिनेत्री रेणुका दफ्तरदार, राधा सागर आदी उपस्थित होते.

तीन दिग्गजांचे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येणे तर आहेच, पण प्रसाद ओकच्या पंचरंगी भूमिकेची उत्कंठा प्रेक्षकांना आहेत. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि गायक अशा बहुपेडी भूमिकेत प्रसाद पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यातही त्याची या चित्रपटातील भूमिका आगळी-वेगळी आहे आणि त्याने त्यातील एक गाणेही गायले आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर प्रसाद ओकचा दिग्दर्शक म्हणून हा नवा चित्रपट आहे.

चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडीओजचे असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. पटकथा व संवाद अजय कांबळे यांचे आहेत. प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाणे, निलेश राठी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 

“आज मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी प्रयोग होत आहेत. कथेच्या बाबतीत हासुद्धा एक तसाच प्रयोग आहे. ही अगली कथा प्रेक्षकांना आनंद देवून जाईल,” असे उद्गार प्रसाद ओक यांनी काढले. स्वप्नील जोशी म्हणाला, “हा चित्रपट निखळ करमणुकीची हमी देतो. टीझर, ट्रेलर पाहिल्यावर हे मनोमन पटल्याशिवाय राहत नाही. माझी आणि सोनाली कुलकर्णी यांची अगली केमिस्ट्री आणि प्रसादचे दिग्दर्शन हा बेत फक्कड जमून आला आहे.”

सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “अभिनयाचा कस लावणाऱ्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या भूमिका करायला मला आवडत. “सुशीला-सुजीत”माझी भूमिका तशीच आहे. स्वप्नील आणि प्रसादबरोबर पहिल्यांदाच काम करत होते, त्यामुळे हएक्साईटमेंट होतीच. प्रत्यक्षात काम करताना खूपच धमाल आली. कथा, संकल्पना, संवाद त्यांनी निर्मितीमुल्ये या सर्वच बाबतीत चित्रपट वेगळा आहे. मला पूर्ण खात्री आहे, प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शेअरमार्केट ट्रेडिंग नावाने १ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणा-या ६ भामट्यांना १२ दिवसांची कोठडी

पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या...

विक्रमी वीजजोडण्यांमुळे महसूलात ५१३७ कोटींनी वाढ

महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये वीजहानीत घट पुणे, दि. ०७ एप्रिल २०२५: गेल्या...

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पुणे : प्रतिनिधीहिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...