विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : प्रतिनिधी
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. गणपती मंदिरात श्रींच्या आरतीबरोबरच ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रामनवमी निमित्ताने गणपती मंदिरात भगवान प्रभू श्रीरामाचे भव्य आणि आकर्षक शिल्प उभारण्यात आले होते. संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ‘हेल सर्विसेस’चे सहायक संचालक प्रशांत वाडीकर आणि ‘फॅमिली वेल्फेअर’च्या सहायक संचालक डॉ. सुनिता वाडीकर यांच्या हस्ते सकाळी साडेवाजता श्रींची भक्तिभावपूर्वक आरती करण्यात आली तर दुपारी परंपरेनुसार ‘श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून तुळशीबाग राम मंदिर, जोशी राम मंदिर आणि सोमवार पेठ काळाराम मंदिर येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी मानाची ताटे अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला. राम नवमीनिमित्त मंदिरात संपूर्ण शहरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व, विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.