पुणे- अनधिकृत बांधकामे करणाऱ्या वर कारवाईची हक्क जसा महापालिकेला आहे तसा तो पोलिसांना देखील आहे. रस्त्यावर पुढे सरकलेली अतिक्रमणे ,महापालिकेचा परवाना नसलेली अनधिकृत बांधकामे पोलीस हटवू शकतात अथवा ती करणारांवर फौजदारी कारवाई करू शकतात मात्र याकडे आजपर्यंत फारसे लक्ष देण्यात आलेले नाही या पार्श्वभूमीवर अवैध बांधकाम करणा-या एका बांधकाम व्यावसायिकावर कोंढवा पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले कि,’
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर, या भागात मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालीकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे करणा-या बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने वय ४५ वर्षे रा.२१७ गंजपेठ पुणे यांचे विरूध्द पुणे मनपा कडुन अनेकवेळा गुन्हे दाखल असुन सुध्दा परत अशा पध्दतीने अवैध बांधकाम चालु केल्याने पुणे मनपा कडुन पुणे मनपा अभियंता यांच्या तक्रारीवरून कोढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १०७/२५ महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४३,५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी याने जिल्हा सत्र न्यायालय, पुणे यांच्याकडे दाखल गुन्ह्यात
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सदर गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये नवनाथ माने याने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारचे स्थानीक नागरीकांच्या सुरक्षीतेबाबत उपयोजना न केल्याने तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यात भा.न्या. संहिता २०२३ चे कलम १२५,३५१,३१८ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली होती त्या गुन्ह्याच्या अनुषगांने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर आरोपीचा शोध घेवुन त्याला दि. ०२/०४/२०२५ रोजी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सध्या रहात्या घरातुन ताब्यात घेवून त्यास कोर्टासमक्ष हजर केले असता कोर्टाने नवनाथ माने यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक, मयुर वैरागकर, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे हे करीत आहेत.
अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माने नामक बिल्डरवर पोलिसांनी केली धडक कारवाई
Date: