आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक यांच्या पत्नी चे दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना निधन
जुळ्या मुलींना जन्म दिला पण आई गेली… BJP आमदार गोरखेही व्यवस्थेसमोर हतबल, मंगेशकर हॉस्पिटलला इशारा
रुग्णालयाचे स्पष्टीकरण…बदनामी म्हणत प्रशासनाचं मोठं पाऊल…
भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आणि माध्यमांनी बातमी उचलून धरल्यानंतर अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या घटनेवर स्पष्टीकरण दिले असल्याचे वृत्त आहे. या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय रुग्णालय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले आहे.दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने यावर भूमिका स्पष्ट करताना एकांगी पद्धतीने ही घटना सांगितली जात असल्याचे म्हणत रुग्णालयाची बदनामी सुरू आहे, अशी खंत व्यक्त केली. या संपूर्ण घटनेप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून रुग्णालय यासंबंधी राज्य सरकारला अहवाल सादर करेल, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
पुणे : येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येत आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाने रुग्णाकडे डीपॉझीट म्हणून दहा लाखांची मागणी केली होती.
प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यावर या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेस त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झाला का? असा सवालही उपस्थित केला जातोय. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.
पुण्यातील नामांकित रुग्णालय म्हणून हे रुग्णालय महाराष्ट्रात ओळखले जाते. कोणत्याही दूर्धर आजारावर अधूनिक उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानासोबत निष्णात डॉक्टरांसाठी म्हणून या रुग्णालयाची ख्याती आहे.
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला.