पिठाच्या गिरण्या आणि शिवण यंत्राची भेट
पुणे : सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात, पण त्यांच्या मागे उभ्या असलेल्या वीरपत्नींचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या सौभाग्याला देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या वीरपत्नींच्या जगण्याला आधार देण्यासाठी त्यांना पिठाच्या गिरण्या आणि शिवण यंत्राची भेट देण्यात आली.
शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन च्या वतीने आयोजन वीरमातांना ही मदत करण्यात आली. एरंडवण्यातील सेवाभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुवर्णा गोडबोले, उपाध्यक्ष सतीश राजहंस, अॅड. रजनी उकरंडे, खजिनदार सुजय गोडबोले, सनदी लेखापाल आणि विश्वस्त अभय शास्त्री, विश्वस्त प्रतिक भोसले, प्रशांत शितूत, निलिमा शितूत, विलास मुळे, पुखराज संचेती, सत्यजित शिंदे उपस्थित होते. फाऊन्डेशनचे एक विश्वस्त पुखराज संचेती यांनी २ गरजू महिलांना दोन टिव्हिएस झेस्ट स्कूटर्स भेट दिल्या.
दीपक शहा म्हणाले, प्रत्येकाला सीमेवर जाऊन लढता येत नाही परंतु जे सेनेत गेले आहेत त्यांच्या कुटुंबाला साथ द्या त्यांना मदत करा. आपण जगातील सगळी दुःख कमी करू शकत नाही पण आपल्या आजुबाजूच्या लोकांना मदतीची गरज असेल तर अवश्य करा.
गीता गोडबोले म्हणाल्या, कॅप्टन सुशांत गोडबोले यांना मदत करण्याची खूप इच्छा होती. त्यांचे कार्य सुरू होते. परंतु ते नसतानाही त्यांचे कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. वीरमाता आणि वीरपत्नी आधार देणे महत्त्वाचे आहे, अनेक गोष्टी पैशाने नाही तर मानसिक आधाराने देखील साध्य होतात. तोच मानसिक आणि काही प्रमाणात आर्थिक आधार देण्याचा आणि प्रयत्न करत आहोत.

