पुणे दि. 3: भारतीय नौदल अग्निवीर वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी अग्निवीर योजनेअंतर्गत २0२५-२६ या वर्षासाठी भारतीय नौसेवा अग्निवीर प्रवेशासाठी निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळांकडून गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण एकूण ५०% गुणांसह. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या बारावी बोर्ड परीक्षेत बसणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
उमेदवार अग्निवीर ०२/२०२५, ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी २९ मार्च २०२५ ते १० एप्रिल २०२५ (5 वाजेपर्यंत) या कालावधीत https://joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरतांना योग्य माहिती भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पात्र अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवार व्यक्तीकडून अग्निवीर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
भारतीय नौदल अग्निवीर वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणेबाबत
Date: