पुणे- बाणेर ,कात्रज , धनकवडी, नांदेड सिटी अशा आसपासच्या परिसरासह शहरात डेक्कन आणि जे एम रोड वर आज अवकाळी पावसाने हजेरी लावली . अनेक दिवसांपासून वाढलेला उष्मा आणि काल काही ठिकाणी झालेला अवकाळी पाउस आज सर्वत्र कोसळला , काही वेळ जोरदार वारा , काही वेळ रिमझिम धारा , आणि काही वेळ कोसळणाऱ्या जलधारा यामुळे शहर आणि परिसरात सर्वत्र झालेला हाच पहिला अवकाळी पाउस ठरला. पाच वाजता सुरु झालेल्या पावसाच्या धारा साडेसह वाजले तरी बरसतच होत्या. आपल्याकडे प्रथा आहे पाउस येणार म्हटले कि महावितरणची बत्ती अगोदर गुल होते आणि पाउस येऊ लागतो या प्रमाणे अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यात व्यत्यय येत होता पण नंतर तो सुरु देखील होत होता .
पुणे शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
Date: