पुणे, दि. 3: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त एकूण 13 प्रकरणापैकी 11 प्रकरणे निकाली काढण्यात आले तर उर्वरित 2 प्रकरणावर कार्यवाही सुरु आहे.
म्हाडा प्राधिकरणाचे उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 9 जानेवारी 2025 रोजी झालेल्या विभागीय मंडळाच्या बैठकीत नागरिकांच्या प्रश्न तत्परतेने सोडविण्याकरिता लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले, त्यानुसार हा जनता दरबार घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.