मध्यरात्री १२ वाजता देखील संसद सभागृह कामकाज सुरूच
नवी दिल्ली- अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले. रिजिजू यांनी याला उम्मीद (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट) असे नाव दिले आहे.AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ विधेयकाला विरोध केला. ते म्हणाले- हे कलम २५, २६ चे उल्लंघन आहे. हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे.
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. मी गांधींसारखे वक्फ बिल फाडतो. विधेयक फाडल्यानंतर ओवेसी संसदेच्या कामकाजातून निघून गेले.
ओवेसी यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपा देशात संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप केला. तसेच महात्मा गांधी यांनी जसे आफ्रिकेत कायदा फाडलेला तसे मी हे वक्फ विधेयक फाडत असल्याचे सांगत लोकसभेत वक्फ विधेयक फाडत विरोध दर्शविला आहे.
या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. हे कलम २५, २६ चे उल्लंघन आहे. हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप त्यांनी केला.