पुणे-अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी कोर्टाने दीड वर्षाच्या आत निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुअनव्न्यत आली आहे अशी माहिती येथे हडपसर पोलीसांनी दिली.
पोलिसांनी असे सांगितले कि,’हि घटना दिनांक १४/११/२०२३ रोजी दुपारी २/१५ वा. सुमारास आर्मी पब्लीक स्कुल गेटच्या समोर व सायं. ०५/०० वा. सुमारास आरोपी राजेंद्र महारु पाटील याच्या राहते घरी निर्मल टाऊनशिप, डी-१, काळेपडळ, पुणे येथे घडली . राजेंद्र महारु पाटील, वय ५६ वर्षे, रा. निर्मल टाऊनशिप, डी-१, काळेपडळ, पुणे याने यातील अल्पवयीन पिडीत निर्भया ही आरोपी यांच्या रिक्षामध्ये एकटी बसलेली आहे, या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ती अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असताना तिचा विनयभंग करून व सायं. ५:०० वा. आरोपीने अल्पवयीन पिडीत निर्भया हिस त्याचे घरी बोलावून परत विनयभंग केला म्हणन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे, यानी केला व यातील आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले.
या प्रकरणामध्ये सबळ साक्षी पुराव्याअंती विशेष न्यायाधीश (पोक्सो), जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक ०२/०४/२०२५ रोजी आरोपी राजेंद्र महारु पाटील, वय ५६ वर्ष यास ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील नितीन कोधे, कोर्ट परैवी पो. अमंलदार सभाजी म्हागरे यानी कामकाज पाहिले.
या कामगिरी करीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, डॉ. राजकुमार शिंदे पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोलीस अमंलदार सभाजी म्हांगरे व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि प्रविण अब्दागिरे सध्या नेमणूक काळेपडळ पोलीस ठाणे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

