पुणे २ – बासरीवादनातून कल्याण थाट आणि जोड रागाच्या संयोगाने विविध पंचवीस रागांचा वेणू आविष्कार कल्याण नवरंग सागर पंडित केशव गिंडे यांनी आपल्या शिष्यासमवेत साकारला.
निमित्त होते अमुल्य ज्योती प्रतिष्ठान व महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह ट्रस्ट च्या वतीने पंडित पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त “अमुल्य ज्योती संगीत महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले.
महामाहोपाध्याय डॉ. पं. केशव गिंडे यांनी कल्याण नवरंग सागर ही अतिशय मधुर अशी संगीत रचना आपल्या शिष्यासमवेत सादर करताना राग यमन,यमन कल्याण,राज कल्याण, शुद्ध कल्याण, हंस कल्याण,श्याम कल्याण,मारूबिहाग,चांदनी केदार आदी राग विस्तारातून हे राग अत्यंत सुरेलपणे गुंफून सारे वातावरण वेणूमय झाले.
त्यांना वेणूसाथ दीपक भानूसे,धवल जोशी,निरंजन भालेराव, जितेंद्र रोकडे, आशुतोष जातेगावकर,सुनील बंडिवाड सिध्दांत कांबळे, परंतप मयेकर या शिष्यांनी केली.
तुकाराम जाधव (तबला), प्रकाश बेहरे ( की- बोर्ड) व प्रणय सकपाळ ( पखवाज) यांनी साथ केली.
यानंतर दुसर्या सत्रात पं.संजय गरुड यांनी बागेश्री बडा ख्याल व छोट्या ख्यालातील ” कोन करत तोरी बिनती पिहरवा” व त्यानंतर पटदीप रागातील ” बाजे मुरलिया ” हे भजन बहारदारपणे सादर केले. शेवटी ” जो भजे हरी को ” ही भैरवी सादर केली.
त्यांना प्रकाश बेहरे ( हार्मोनियम) ऋषिकेश जगताप (तबला) व ऋग्वेद जगताप (पखवाज) यांनी साथ संगत केली.
यावेळी बासरी बनविणारे कोल्हापूर येथील सयाजी पाटील यांचा पुणेरी पगडी घालून विशेष सत्कार प्रसिद्ध बासरीवादक पं.राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
मिलिंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या वेळी गान रसिकांची मोठी उपस्थिती होती.
वेणू वादन अविष्कारातून साकारला कल्याण नवरंग सागर
Date: