पुणे- शहरासह जिल्ह्यात लपुनछपून गुटखा तस्करी करणार्या व पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याचा ट्रक पळवून नेणार्या कुख्यात गुटखा तस्कर निजामुद्दीन महेबुब शेख (40, रा. लोहीयानगर, गंजपेठ, मयुरपंगख सोसायटी, कोंढवा) याला नुकतेच राजगड पोलिसांनी अटक केले होते. त्याची न्यायालयीन कोठडीत रवागनी झाल्यानंतर पुणे शहर पोलिसांत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असून त्याचा लवकरच ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.
दि. 28 मे 2023 रोजी पहाटे अडीच ते पाच वाजण्याच्या सुमारास खेडशिवापूर येथील भरामनगर येथील रोडवर गुटख्यासह 81 लाख 21 हजारांचा आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला होता. तो ट्रक चौकीच्या समोर उभा असताना तो ट्रक निजामुद्दीन शेख आणि त्याच्या साथीरांनी परस्पर पळला होता. याप्रकरणात तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक हा निजामुद्दीन होता.
याप्रकरणात नंतर अटक झालेल्या व जामीन झालेल्या आरोपींच्या चौकशीनंतर तब्बल 41 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दि. 24 मार्च रोजी निजामुद्दीन शेख याला अटक करण्यात आली होती. निजामुद्दीन शेखचे दोन बँकेत खाते असून त्या खात्यामूधन करोडो रूपयांचे ट्रान्झॅक्शन झाले आहे. दि. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यानस 8 कोटी 54 लाख 82 हजारांचे डेबीट व 7 कोटी 92 लाख 28 हजारांचे त्याच्या बँक खात्यावर क्रेडीट दिसत आहे. त्याच्याकडील तपासामध्ये तो येरवडा पोलिस ठाणे, खडक पोलिस ठाणे, काळेपडळ पोलिस ठाणे यातील फरार असलेला आरोपी होते. त्याच्यामार्फत शहरात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली होती. त्याची नुकताच येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
राजगडच्या गुन्ह्यातील अजूनही 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हातील लागला नाही. त्याने चोरी केलेला माल भोर येथील शिंदेवाडी येथे नेवुन दुसर्या वाहनाचा वापर करून ट्रक मधील गुअखा दुसराया वाहनाचा वापर करून चोरून नेल्याचेही निष्पन्न झाले. गुन्हा केल्यानंतर तो गुटख्याचा बेकायदेशिर व्यावसाय करत होता. या दरम्यान तो माल कुणाला देत होता ? तुमकुर येथे जावुन तो हा अवैध गुटखा महाराष्ट्रात आणून त्याची तस्करी करत असल्याचे त्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान काळेपडळ, येरवडा आणि खडक पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात तो पाहिजे असलेला आरोपी असल्याने त्याचा लवकरच ताबा घेतला जाणार असल्याचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकडे यांनी सांगितले.

