औंध गाव जुन्या जकात नाक्याच्या जागेवर नवीन बसस्थानकाचे उद्घाटन संपन्न
पुणे–औंध गाव जुन्या जकात नाक्यावरून बसेसच्या ३ नवीन मार्गांचे उद्घाटन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचे प्रमुख उपस्थितीत व पीएमपीएमएल च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांचे हस्ते करण्यात आले
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशी बससेवा पुरविण्यात येते. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध या भागात सततच्या वाहतूक कोंडीमुळे संचलनात असलेल्या मार्गांवरील नियोजित खेपा पूर्ण होणे शक्य होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. जास्त फेऱ्या,जास्त बसेस उपलब्ध करणे अडचणीचे होते.यामुळे परिवहन महामंडळाच्या संचलन कार्यक्षेत्रातील प्रवाशांना तत्पर व विश्वसनीय सुलभ बससेवा देण्याच्या दृष्टीने महामंडळामार्फत दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध जकात नाक्याची जागा आता बस स्थानकामध्ये विकसित करण्यात आली आहे.
या औंध बसस्थानकातून बसमार्ग क्र. ३४ औंध ते मुकाई चौक रावेत, बसमार्ग क्र. १२४ औंध ते निलसॉफ्ट कंपनी
हिंजवडी फेज ३ व बसमार्ग क्र. ३६०अ औंध ते आळंदी हे नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत.
तरी सर्व नागरिकांनी औंध बसस्थानकातून संचलनात सुरू झालेल्या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
