पुणे-राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ च्या PSI पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण ३७४ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अश्विनी बाबुराव केदारी हिने २८१.५ गुण मिळवून महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली अश्विनी बाबुराव केदारी मूळची पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावची आहे. तिचे वडील बाबुराव केदारी हे शेतकरी आहेत. अश्विनी ने इंजिनीअरिंग करत असताना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली होती. इंजिनीअरिंग चे शिक्षण पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲड रिसर्च पर्वती या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातून पूर्ण केलेआहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे असा मोलाचा सल्ला अश्विनी केदारी हिने दिला. अश्विनीच्या या यशाबद्दल मा.किशोरराजे निंबाळकर, माजी अध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोग व डॉ.नवनाथ पासलकर माजी सदस्य, राज्य लोकसेवा आयोग यांचे हस्ते अश्विनीचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.
अश्विनीच्या या यशाबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, प्रा. गणेश कोंढाळकर, डॉ.दत्तात्रय कांबळे, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

