मुंबई-एकीकडे मुबीत शिवसेना शिंदे गटाचे काहीजण कामरा याचे स्वागत करू असा धमकीवजा इशारा देत असताना दुसरीकडे दोन वेळा समन्स बजावूनही कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. म्खाहणून र पोलीस मुंबईतील माहिम येथील कुणाल कामरा याच्या वडिलांच्या घरी दाखल झाले. त्यांनी कुणाल कामराच्या पालकांकडे चौकशी केली. कुणालशी संपर्क झाला आहे का? तो मुंबईत येणार आहे का? चौकशीसाठी हजर होणार आहे का? असे प्रश्न पोलिसांनी कुणालच्या आई-वडिलांना विचारले.
कुणाल कामरा याने २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ‘युनिकॉन्टिनेंटल’ हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ या स्टुडिओमध्ये ‘नया भारत’ हा स्टॅण्ड अप कॉमेडी शो आयोजित केला होता. याच शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता सादर केली होती. या शोमध्ये जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना देखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलीस या शोमधील प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार असून काही प्रेक्षकांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.