राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने वसुली चे धोरण अन त्यामुळे महागाई
मुंबई- घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आजपासून नव्या रेडीरेकनर दरांमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडाच्या वाहनांच्या किमती वाढल्या आहेत,मारुती सुझुकीच्या गाड्या ४% पर्यंत महागल्या आहेत, हे मॉडेलनुसार बदलू शकते. रेडिरेकनरच्या दरात पुण्यात सरासरी ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी-चिंंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचे आणि जमिनींचे दर चढे राहणार आहेत.पुण्यात सरासरी ४.१६ टक्के वाढ करण्यात आली आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील घरांच्या किमतीही वाढणार आहेत. कोरेगाव पार्क, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, बोट क्लब, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरातील घरांना जास्त मागणी असते. त्यामुळे या भागातील रेडिरेकनरच्या दरातही वाढ होणार आहेपिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विकास होत आहे. या महापालिका हद्दीत असलेल्या औद्योगिक कंपन्या, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे जाळे यामुळे या भागातील सदनिकांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणामही पिंपरी-चिंचवडमधील रेडिरेकनरच्या दरावर दिसून आला आहे. त्यामुळे पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात रेडिरेकनरच्या दरात वाढ झाली आहे.महिलांसाठी सरकारकडून चालवली जाणारी विशेष गुंतवणूक योजना ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) बंद करण्यात आली आहे. या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ होती. या योजनेत ७.५% वार्षिक व्याज देण्यात आले. यामध्ये, किमान १००० रुपये ते जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक २ वर्षांसाठी करावी लागणार होती.आज म्हणजेच १ एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह इतर योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने, राज्य सरकारने चालू बाजारमूल्य दरांत (रेडीरेकनर) घसघशीत वाढ केली आहे. मुंबईत ३.३९ टक्के, ठाण्यात ७.७२ टक्के आणि राज्यात सरासरी ४.३९ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १०.१७ टक्के वाढ झाली असून नवे दर आज, मंगळवारपासून लागू होतील. त्यामुळे घरे महागणार आहेत.