रमेश बागवे,मोहन जोशी, अभय छाजेड,संजय बालगुडे यांच्यावरही वेगवेगळी जबाबदारी
मुंबई-कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरात काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक नेमून त्या जिल्ह्यात काँग्रेसची नक्की परिस्थिती काय आहे, याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायचा आहे. यामध्ये हे निरीक्षक ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी ही सतेज पाटील यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर येत्या काही काळात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत हे आता निश्चित झाले आहे.दरम्यान पुण्यातील प्रमुख चार नेत्यांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जुन्या विश्वासू सहकाऱ्यांवरच विश्वास दाखवला आहे. यामध्ये माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर परभणी जिल्ह्याची,माजी विधानपरिषद सदस्य मोहन जोशींवर सोलापूर,तर अभय छाजेड यांच्यावर लातूर तर संजय बालगुडे यांच्यावर कोल्हापूर बाबतचा योग्य अहवाल देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक नेमून त्या जिल्ह्यात काँग्रेसची नक्की परिस्थिती काय आहे, याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायचा आहे. यामध्ये हे निरीक्षक ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटनेची ताकद, गटबाजी, निवडणूक जिंकण्याची क्षमता या सगळ्या बाबींवर हा अहवाल असणार आहे. हा अहवाल पाहून झाल्यानंतर राज्यभरात आधी मंडल, नंतर शहर, जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत.

