गेवराई–मशिदीत जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवल्याची घटना अर्धमसला (ता.गेवराई) गावात घडली. या घटनेनंतर दोन्ही संशयित विजय गव्हाणे व अशोक तागडे हे दुचाकीने ३५किमीवरील शिंपेगाव येथे पळून गेले. शिंपेगाव हे संशयितगव्हाणेच्या मावशीचे गाव आहे. दोघे त्या गावात मावशीच्यामक्याच्या शेतात लपून बसले होते. गेवराई पोलिसांनी घटनेनंतर ३तासांतच रविवारी सकाळी ६ वाजता दोघांना शेतातून अटक केली. दोघांनी स्फोटासाठी मशिदीच्या मागील खिडकीतून प्रवेशकरत खड्डा खोदून जिलेटिन पुरले होते. मोबाइल लोकेशनवरूनत्यांना पोलिसांनी पकडले.अर्धमसला येथील शेतकरी जना कांदे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरुआहे. त्या कामावरून संशयित विजय गव्हाणे याने जिलेटीनच्या कांड्या चोरूनआणल्या होत्या. त्यांचा वापरस्फोटासाठी केला. दोघांना गेवराई न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षकनवनीत काँवत, संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी अर्धमसला गावात जाऊन व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा करत पाहणी केली.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनीही गावात जाऊन माहिती घेतली आहे. राशेदअली हुसेन सय्यद (६९) यांनी तलवाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर भारतीय न्याय संहिता२०२३ अंतर्गत समाजात तेढ निर्माण करणे, कट रचणे,जातिवाचक शिवीगाळ, स्फोट घडवणे, धार्मिक भावना दुखावणेकलम २९८, २९९, १९६, ३२६(जी), ३५१(२), ३५२, ६१(२),३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मिनिटांत पोलिसांना कळवले अर्धमसला गावातील माजी सरपंच बाळासाहेब राऊत यांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली.घटनेनंतर गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील संशयित विजय गव्हाणे याचे घर मशिदीपासून २०० मीटर अंतरावर आहे. घटनास्थळी पोलिसांना एक टॉर्च , फरशीचे तुकडे मिळाले. संशयिताने मशिदीपासून वायर टाकून घरात बसूनच स्फोट घडवला असावा असा अंदाज आहे.
घटनेच्या निषेधार्थ गेवराईशहरातील शास्त्री चौकातशहर बंद करण्याचा निर्णय घेतला होता, तर काहीठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानेबंद ठेवली होती. गेवराईचेआमदार विजयसिंह पंडितयांनी मध्यस्थी केली.तपासात हलगर्जीपणा झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनीदिला. त्यामुळे गेवराई शहरबंदचा निर्णय मागे घेण्यातआला. तर दुसरीकडेघटनेचा निषेध म्हणून तलवाडा येथील व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. मात्र, आरोपींना अटक होताच बाजारपेठ पुन्हा सुरूकेली. व्यापाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवला.

