पंतप्रधानांची नागपूर येथील स्मृती मंदिराला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुर येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. के. बी. हेडगेवार आणि एम. एस. गोळवलकर यांना आदराजली अर्पण केली.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“नागपूर येथील स्मृती मंदिराला भेट देणे हा एक विशेष अनुभव आहे.आजची ही भेट आणखी खास यासाठी आहे, कारण ती वर्षप्रतिपदेच्या शुभदिनी झाली आहे, जो परम पूज्य डॉक्टरसाहेबांचा जयंती दिवस देखील आहे.माझ्यासारख्या असंख्य लोकांना परम पूज्य डॉक्टरसाहेब आणि पूज्य गुरुजी यांच्या विचारांतून प्रेरणा आणि शक्ती मिळते. या दोन महान व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्याचा सन्मान मिळाला, असून ज्यांनी एक मजबूत, समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या गर्व करण्याजोग्या भारताची कल्पना केली होती.”

पंतप्रधान मोदी रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय केशव कुंज येथे पोहोचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.
यानंतर ते दीक्षाभूमीला गेले आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी हे आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी येथे येऊन ध्यानधारणा केली होती.यानंतर, पंतप्रधानांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आमचे सरकार जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहे. डायलिसिस सेंटर्स खुली आहेत, जिथे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध आहेत. आपण देशाला प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोदी शेवटचे १६ जुलै २०१३ रोजी संघाच्या मुख्यालयात गेले होते. २०१२ मध्ये संघ प्रमुख के एस सुदर्शन यांच्या निधनानंतरही ते येथे आले होते. पंतप्रधान पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत आहेत.हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी संघ कार्यालयात होणाऱ्या प्रतिपदा कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहतील. ते कार्यक्रमाला संबोधित देखील करू शकतात.पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत.

