सामाजिक न्यायाचे आणि वंचितांना सक्षम बनवण्याचे प्रतीक म्हणून नागपुरातील दीक्षाभूमीची प्रशंसा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कल्पना केलेल्या भारताला साकार करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुचार केला.
X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“नागपूरातील दीक्षाभूमी सामाजिक न्यायाचे आणि वंचितांना सक्षम बनवण्याचे प्रतीक म्हणून उंच उभी आहे.
आपली प्रतिष्ठा आणि समानता सुनिश्चित करणारे संविधान दिल्याबद्दल भारताच्या भावी पिढ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सदैव आभारी राहतील.
आपले सरकार नेहमीच पूज्य बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आले असून त्यांच्या कल्पनेतील भारत साकार करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.”

