पुणे-मागील शतकातील दुर्मिळ व नामवंत अशा हंबर, क्रायस्लर, ऑस्टिन, लिमोझिन, एरियलस्लोपर, मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू, फोर्ड, इंपाला, शेवरले, एमजी,फोक्सवॅगन, ओव्हर लँड, सिट्रॉन, फियाट अशा १०० हून अधिक दुर्मिळ व्हिंटेज आणिक्लासिक कार्स व १०० हून अधिक दुर्मिळ मोटरसायकल्स व स्कूटर्सचे भव्य प्रदर्शनाचेउद्घाटन पुण्यातील व्हिंटेज व क्लासिक कार्सचे प्रख्यात संग्राहक योहान पूनावाला यांच्या
हस्ते रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आज संपन्न झाले. यावेळी हजारो पुणेकरांनी गर्दीकेली होती. हे प्रदर्शन रविवारी देखील सकाळी १०.०० ते सायं ६.०० पर्यंत नागरिकांसाठीविनामूल्य खुले आहे.
व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया यांनी याचे आयोजन केले असून वेस्टर्न इंडियाऑटोमोबाईल असोसिएशनचा सहयोग लाभला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारमिळाल्याबद्दल योहान पूनावाला यांचे विशेष सत्कार व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफइंडियातर्फे करण्यात आला. तसेच पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्यास्मृतीप्रित्यर्थ या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट व्हिंटेज कार व सर्वोत्कृष्ट क्लासिक कार यांना विशेष
ट्रॉफी देण्यात आली.मिशेलिन इंडिया आणि एन एम टायर्स हे मुख्य प्रायोजक असून, रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फक्लब (RWITC) यांचे सहप्रायोजक आहे. तसेच, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्यानेआणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा
सोहळा संपन्न होत आहे. वेंकीज ग्रुप हे देखील प्रायोजक आहेत.
याप्रसंगी उद्घाटन करतांना योहान पूनावाला म्हणाले की, पुण्यात व्हिंटेज आणि क्लासिककार प्रदर्शनाचे पुन्हा आयोजन होत आहे ही आनंदाची बाब आहे. या इव्हेंटला ग्लॅमर आहेतसेच हा इव्हेंट आनंदही देणारा आहे. त्यामुळेच माझ्या संग्रहातील अनेक व्हिंटेज व क्लासिक गाड्या मी यात प्रदर्शित करतो. पुणेकरांनी फार मोठा प्रतिसाद दिला याबद्दलत्यांनी पुणेकरांचे आभार मानले.
याप्रसंगी व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा,सुभाष.बी.सणस व्हिंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस, वेस्टर्न इंडियाऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, सरचिटणीस अर्णव एस., माजीसरचिटणीस व या प्रदर्शनाचे जज सुभाष गोरेगावकर, झवारे पूनावाला, निशांत डोसा,धनंजय बदामीकर, एनएम टायर्सचे अनिल मेहता व निशांत मेहता यांसह व्हिंटेज अँड
क्लासिक कार्सचे संग्राहक व प्रेक्षक मोठ्ये संख्येने उपस्थित होते.मुंबईचे अब्बास जसदानवाला यांची भारतातील सर्वात जुनी धावणारी १९०३ची कार हंबर, सुभाष.बी.सणस व्हिंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस यांच्यामालकीच्या १२ गाड्या असून नेताजी सुभाषचंद्र बोस कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला, हॉलिवूड स्टार अलपचिनो यांची मर्सिडीज बेंझ, बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, चंकी पांडे यांच्या मर्सिडीज बेंझ, ब्रुनेईचे राजे यांची १९८१ मर्सिडीज-बेंझ लिमोझिन, जर्मन पोलिसप्रमुखांनी वापरलेली १९८२ मर्सिडीज-बेंझ इत्यादी, नितीन डोसा यांच्याकडील १९५२ची मद्रास गव्हर्नर यांची क्रायस्लर कन्व्हर्टिबल, यश रुईया यांच्याकडील १९४७ एमजी, योहान पूनावाला यांच्या संग्रहातील २० व्हिंटेज कार प्रदर्शनात असून त्यामध्ये १९२७ची रोल्सरॉयस २० एचपी, १९४९ची बेंटले मार्क ६, १९५९ची बीएमडब्ल्यू इसेटा ३००, १९६२ची फोक्सवॅगन बीटल, २०१५ची फेरारी अपर्टा इत्यादी, श्रीकांत आपटे यांची १९३१ची शेवरले, शेखर सावडेकर यांची १९४२ची फोर्ड जीप, १९१९ ओव्हर लँड, धनंजयबदामीकर यांच्या संग्रहातील १० व्हिंटेज कार प्रदर्शनात असून १९४६ची सिट्रॉन ट्रॅक्शनअवंत, हरित त्रिवेदी यांची १९३१ची एरियल स्लोपर, संजय साबळे यांच्या संग्रहातील ५व्हिंटेज कार, डॉ. प्रभा नेने यांची ऑस्टिन ७ व अन्य सेलिब्रिटीज यांच्या व्हिंटेज कार्सचासमावेश आहे.
या व्यतिरिक्त ‘बॉबी’ फेम राजदूत मोटार सायकल, १९३८ची सर्वात जुनी मोटारसायकलनॉर्टन 500 देखील प्रदर्शित केले आहे.
पुणेकरांनी या प्रदर्शनासाठी मोठा प्रतिसाद दिला. या बद्दल नितीन डोसा आणि सुभाष सणस यांनी पुणेकरांना धन्यवाद देऊन रविवारी पाडव्याचा दिवशी देखील हे प्रदर्शनबघण्यास यावे असा आग्रहाचे निमंत्रण दिले.
व्हिंटेज व क्लासिक कार्स प्रदर्शनाचे योहान पूनावाला यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
Date:

