मुंबई-
केंद्र लोकसेवा आयोगाने (UPSC) ने 09 फेब्रुवारी, 2025 रोजी घेतलेल्या संयुक्त भूवैज्ञानिक (प्राथमिक) परीक्षा- 2025 च्या निकालांच्या आधारे खाली उल्लेख केलेल्या अनुक्रमांकांचे उमेदवार संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा-2025 साठी पात्र ठरले आहेत. हा निकाल केंद्र लोकसेवा आयोगाच्या सन्केतस्थळावर https://www.upsc.gov.in उपलब्ध आहे.
परीक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये या उमेदवारांची उमेदवारी पूर्णत: तात्पुरती असून आयोगाने नमूद केलेल्या अर्हतेच्या सर्व अटी त्यांनी सर्व काळी पूर्ण करणे गरजेचे आहे. पात्र घोषित केलेल्या सर्व उमेदवारांनी संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 च्या टप्पा -II साठी 21 व 22 जून 2025 रोजी हजर असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी कृपया खनिकर्म मंत्रालयाने भारतीय राजपत्राच्या एक्स्ट्राऑर्डिनरी भाग 1, प्रभाग 1 मध्ये 4 सप्टेंबर 2024 रोजी दिलेले संयुक्त भूवैज्ञानिक परीक्षा 2025 बद्दलचे सर्व नियम व दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाने जारी केलेली परीक्षा सूचना क्रमांक 01/2025‐GEOL नीट वाचावेत असे सूचित केले जात आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत. उमेदवारांनी संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 टप्पा -II साठीची त्यांची ई-प्रवेश पत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरून संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 सुरु होण्याच्या 1 आठवडा आधी डाउनलोड करावीत. संयुक्त भूवैज्ञानिक (प्राथमिक) परीक्षा- 2025 साठीचे गुण व कट ऑफ गुण आयोगाच्या संकेतस्थळावर https://www.upsc.gov.in परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया संपल्यावर अर्थात संयुक्त भूवैज्ञानिक परीक्षा 2025 चे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अपलोड केले जातील. संयुक्त भूवैज्ञानिक (मुख्य) परीक्षा 2025 साठी परीक्षा केंद्र किंवा विषय बदलून देण्याच्या विनंत्या कोणत्याही परिस्थितीत मान्य केल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
3. केंद्र लोकसेवा आयोगाने त्याच्या परिसरात एक सुविधा केंद्र उघडले आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा अथवा निकालांबद्दल कोणतीही माहिती / स्पष्टीकरण सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या दरम्यान स्वतः भेट देऊन अथवा 23388088, (011)‐23385271/23381125/23098543 या दूरध्वनी क्रमांकांवर मिळवता येईल. उमेदवारांना त्यांच्या प्रश्नांसाठी usgeol-upsc[at]nic[dot]in या ईमेल पत्त्यावर मेल करता येईल.

