पुणे (ता. २७ मार्च): भारतीय सैन्याने देशावर आलेल्या प्रत्येक धोक्याला यशस्वीपणे परतवून लावले असून, आपले लष्कर नेहमीच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
भारत-पाकिस्तान युद्धाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि लष्करी इतिहास व माजी सैनिकांसोबत कार्यरत असलेल्या ‘ऑलिव्ह ग्रीन’ या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मार्बल सभागृहात १९६५ च्या युद्धातील छायाचित्रे व माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. पराग काळकर बोलत होते.
या वेळी ‘ऑलिव्ह ग्रीन’ संस्थेचे संचालक ले. कर्नल (नि.) अवधूत ढमढेरे, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, काशिनाथ देवधर, डॉ. संजय तांबट तसेच विद्यार्थी उपस्थित होते. युद्धाच्या छायाचित्रांचे अंगावर शहारे आणणारे विश्लेषण लष्करी इतिहासतज्ज्ञ नितीन शास्त्री यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तांबट यांनी केले.