ठाण्याच्या “लावणी नृत्य” प्रशिक्षण शिबिरात,विदयार्थ्यांमध्ये आनंद…. उत्साह… आणि जोश.
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या सहकार्यातून ठाण्यात सध्या बहुरंगी बहुढंगी असे दहा दिवसांचे “लावणी नृत्य प्रशिक्षण शिबीर”सुरू आहे.
काही मंडळींनी बदनाम केलेल्या लावणीला आज शासनाने या शिबीराच्या माध्यमातून राजश्रय दिला आहे. म्हणूनच या शिबिराच्या संचालिका शैला खांडगे यांच्यावर विश्वास दाखवत या शिबीराच्या प्रशिक्षणासाठी डॉक्टर वकील, उद्योजिका महिलांनी आज वेळात वेळ काढून प्रवेश घेतला आहेत.
बुधवार दि. 26मार्च रोजी या शिबिरातील प्रशिक्षणार्थी विध्यार्थ्यांना लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ गणेश चंदनशिवे यांनी एक ते दिड तास प्रात्यक्षित्य करून लावणीची परंपरा या विषयावरचे धडे दिले.डॉ. मुकुंद कुळे यांनी लावणीचा सिद्धातिक इतिहास सांगितला, तर मंत्रालयातील पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी लावणीला परंपरा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन विविध शिबीरं आयोजित करते.त्यामुळे पुढच्या पिढीने ही परंपरा शास्त्रशुद्ध शिक्षण घेवून जपावी.असे विदयार्थ्यांना सांगितले.
लावणी सम्रादयी प्रमिला लोदगेकर यांनी लावणीचा ठेका धरून नृत्य सादर केले. यावेळी त्यांनी आपल्या लावणी नृत्याची परंपरा सांगितले.यावेळी लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे मनःभरून कौतुक केले.
शिबीराच्या संचालिका शैला खांडगे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.
येथे शिकविली जाते पारंपारिक लोककला
गण गवळण, मुजरा, छक्कड,शृंगारीक लावणी असे विविध कला प्रकार दहा दिवस शिकविले जाणार आहेत.त्यामुळे आम्हाला कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत आहेत. म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर आनंद आहे…. मनात उत्साह आहे…. अन तेवढा जोश सुद्धा आहे. असे येथील आलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थाचे प्राजंळ मत आहेत.