पुणे- वाढत्या गुन्हेगारीने शहराला आणि राज्याला त्रस्त केले असताना पुण्यातील रेल्वे स्थानकावर महिला, त्यांची बालके आणि एकूणच प्रवासी देखील सुरक्षित नसताना त्यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक करणाऱ्या रेल्वे अधिकार्यांना आज पुण्यात शिवसेनेने धारेवर धरले यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलीस बोलाविले पोलिसांनी मध्यस्थी करत लेखी निवेदन द्यायला लाऊन रेल्वे सुरक्षेचे महत्व पटवून दिले यावेळी पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भातील मागण्या रेल्वे प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. या सर्व आंदोलनाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहिल.असा इशारा पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.
याप्रसंगी विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, विभाग प्रमुख अनिल दामजी,अनिल परदेशी, रोहिणी कोल्हाळ, युवराज पारिख, गिरीश गायकवाड, नितीन थोपटे, शैलेश जगताप उपस्थित होते.संजय मोरे यावेळी म्हणाले,‘पुणे रेल्वे स्टेशनला लाखो प्रवासी रेल्वेने ये जा करत असतात. त्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु रेल्वे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास येते. आताची रेल्वे स्टेशनची परिस्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झालेली आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुरक्षेचे संदर्भात अनेक निवेदनं दिली व आंदोलन सुद्धा केले. त्यावेळी आम्हाला त्या वेळेचे डी आर एम दुबे मॅडम यांनी दिनांक 23 मार्च 2023 रोजी सांगितले होते की लवकरच रेल्वे बोर्डाकडून पुणे रेल्वे स्टेशन येथे 120 सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परंतु आत्तापर्यंत कुठेही सीसी कॅमेरे लावलेले नाही. याचा अर्थ रेल्वे रेल्वे प्रशासन सुरक्षिततेच्या बाबतीत चालढकल करत आहे.
शिवसेनेने केलेल्या मागण्या ….
१) व्हीआयपी गेट, अम्ब्रेला गेट ताडीवाला रोड गेट या ठिकाणी 24 तास RPF व GRP पोलीस TC नियुक्त करावे.
२) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात नवीन उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
३) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात RPF व GRP पोलिसांची गस्त वाढवावी.
४) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या मेन गेटच्या व्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद करण्यात यावे.
५) महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.
6) पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची संख्या जास्त असते, त्यामुळे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करावी ( पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करावे व आरक्षण केंद्राच्या आवारात गार्डन सारखे बाकडे बसवावेत)
७) पुणे रेल्वे स्टेशन मधील स्टॉल धारक व फॅन्ड्रीवाले रेल्वे स्टेशन येथे त्यांचे सामान ठेवतात. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसते स्टॉल व फॅन्ड्रीवाल्यांना सामान ठेवण्यासाठी बंदी करावी.
८) पुणे रेल्वे स्टेशन येथील पार्सलवाले कुठल्याही प्लॅटफॉर्मवर कुठेही सामान टाकतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना चालायला सुद्धा जागा रहात नाही. रेल्वे प्रशासनामार्फत आपण पार्सल वस्तूंसाठी नियमित जागा ठरवून द्यावी.
९) दारू पिणारे लोक सर्रासपणे पुणे रेल्वे स्टेशन येथे वावरतात. त्यांना आपण पुणे स्टेशन परिसरात बंदी करावी.
१०) व्हीआयपी गेट समोरील लेनमध्ये RPF पोलीस लोखंडी बॅरिगेड लावतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो व संपूर्ण पुणे स्टेशन परिसर ट्रॅफिक जाम होते. बॅरिगेड लावणे त्वरित बंद करावेत.
11) उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांना स्वच्छ व थंड पाण्याची मोफत व्यवस्था करावी.