पुणे शहरातील वाहतूक हा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असुन साधारणतः शहरातील प्रत्येक व्यवत्तीस दररोज किमान १० कि.मी.चा प्रवास करावा लागतो. वाहतूक कोडीमुळे इंधन अपव्यय, पर्यावरण हानी व मनस्ताप इ. समस्या वाढतात. सन २०२३ मध्ये पुणे शहर हे वाहतुकीचे दृष्टीने सर्वात मंद शहर म्हणून चौथ्या स्थानावर होते तर २०२४ मध्ये ते सातव्या स्थानी होते. त्यामुळे वाहतूकीची समस्या जाणून घेवून ती सोडविणेसाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे झाले होते.
त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून व रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी पुणे शहरातील वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्या सर्व कारणांचा प्रायोगिक अभ्यास करून, Empirical study, प्रत्यक्ष निरीक्षणाचे आधारे, तसेच १. IRC 106-1990-Low Cost Traffic Management Techniques for Urban area, २. IRC SP 043-1994 – Improving Capacity of Roads in Urban area चा वापर करून कमी वेळात व कमी खर्चाच्या उपाययोजना राबविल्या. मुख्य रस्त्यांवरील ट्रॅव्हल टाईम कमी करणे व रस्त्यांची कॅरींग कॅपेसिटी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिका व इत्तर शासकीय विभाग / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने पुणे शहरातील २६५ कि.मी. वे एकूण ३३ मुख्य रस्ते निश्चित करून या रस्त्यांच्या सुधारणांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
माहे सप्टेंबर-२०२४ पासून सुरू केलेल्या या उपक्रमांमध्ये, वाहतूक अभियांत्रिकी बदल, तंत्रशुध्द पध्दतीने व्हेईकल काऊंटचे आधारे राईट टर्न, लेफ्ट टर्न, यु टर्न बंद किंवा सुरू करणे, मुख्य रस्त्यांचे सरफेसींग चांगले ठेवणे, बॉटल नेक दुर करणे, वाहतूकीस अडथळा ठरणारे पीएमपीएमएल बस थांबे, लक्डारी व रिक्षा थांबे स्थलांतरीत करणे, सिग्नल सिक्रोनायझ करणे, सिग्नल टायमिंग व्यवस्थित करणे, चौक सुधारणा, पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधनांचा वापर, वाहतूक विलगीकरण टेक्नीक्स, अतिरिक्त मनुष्यबळ वापरून वाहतूक नियमन व वाहतूक नियमभंग कारवाई, इ. उपाययोजना करण्यात आल्या.
पुणे शहरात सर्वात पहिल्यांदा एटीएमएस, गुगल मॅप, नागरीक तक्रारी व सोशल मिडीया यांचे माध्यमातुन प्राप्त वाहतूक कोंडींचे कारणांचा विश्लेषणात्मक अभ्यास करून त्यानुसार वाहतूक सुधारणा करण्यात येत आहेत.
वरील प्रमाणे केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूकीचा वेग १०.४४ टक्क्याने वाढला असुन, शहरातील मुख्य ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीचे प्रमाण ५३% इतके कमी झाले आहे. या उपक्रमामध्ये खालील प्रमाणे मुख्य बदल करण्यात आलेले आहेत.
१) वाहतूक प्रशिक्षण :-
वाहतूक शाखेकडील अधिकारी व अंमलदारांकरीता वाहतूक नियमन, वाहतूकीचे कायदे व नियम, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल इ. अभ्यासक्रम असणारे प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यात आले असुन अद्याप पर्यत ४४५ अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षीत करण्यात आले असुन उर्वरीत सर्वाना याचप्रमाणे पुढील ६ आठवड्यांमध्ये प्रशिक्षीत करण्यात येणार आहे.
२) सिग्नल यंत्रणेमध्ये बदल केल्याने वाहतूक गतिमान होण्यास मदत :-
एकुण सिग्नल
३०२
एटीएमएस सिग्नल १२४
यापैकी ३३ ठिकाणचे ९७ सिग्नल सिक्रोनाईझ केले, तसेच पहिल्यांदाच ०२ एटीएमएस स्वतंत्र सिग्नल सिंक्रोनाईज्ड केल्यामुळे एकूण ९९ सिंक्रोनाईज्ड सिग्नल व उर्वरीत एटिएमएस स्वतंत्र सिग्नल-२७ आहेत. उर्वरीत १७६ जुने स्वतंत्र सिग्नल असुन त्यापैकी प्रायोगिक तत्त्वावर एकूण ०२ रिमोट कंन्ट्रोल सह सिग्नल आहेत.
वरील प्रमाणे ३०२ सिग्नल पैकी १२४ एटीएमएस सिग्नल असुन त्यापैकी ३३ ठिकाणचे एकूण ९७ +२ सिग्नल जागतीक वेळ, वाहतूकीचा फलो व सिग्नल मधील अंतर इ. बाबींची सांगड घालून सिंक्रोनाईझ करण्यात आले, त्यामुळे सिग्नलवर वाहन चालकांना थांबण्याची वेळ कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे ०२ सिग्नलला रिमोटव्दारे नियंत्रीत करण्यात येत आहे. उर्वरीत १७६ जुन्या सिग्नलबाबत महानगरपालिकेसोबत समन्वयाने उपाययोजना करीत आहोत.
३) खालील प्रमाणे एकूण ५९ ठिकाणी केलेल्या बदलामुळे रस्त्यावरील वाहतूकीचा वेग वाढण्यास मदत :-
रस्त्यांवरील राईट टर्न बंद १५
रोड रुंदीकरण (बॉटलनेक कमी केले) १४
जंक्शन/मिडियन सुरु आणि बंद -०७
पीएमटी बस स्टॉप स्थलांतरीत केले-१०
लक्झरी बस थांबे स्थलांतरीत केले-०२
वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे-०७
वन वे (एकेरी मार्ग) ०२
आयलॅण्ड रिमुव्ह-०२
वाहतूकीचे वर्गीकरण
जड वाहनांना बंदी
४) लक्झरी बसेस करीता ऑफ स्ट्रीट पार्कीग व्यवस्था :
१. सोलापूर रोड वरील हडपसर येथे व
२. अहिल्यादेवी नगर रोडवरील वाघेश्वर अशा २ ठिकाणी लक्झरी बसेस करीता ऑफ स्ट्रीट पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे.
५) वाहतूक कोंडीच्या कारणांचा प्रथमच अभ्यास करून वाहतूक कोंडीच्या संख्येत घट (एटीएमएस, गुगल मॅप, कंट्रोल व सोशल मिडीया कडून प्राप्त माहिती.)करता येईल यासाठी प्रयत्न केले.
कैची पडल्याने
वाहतूक नियमभंग
रस्त्यावरील खड्डे
रस्त्याचे काम चालू
वाहतूक फ्लो जास्त
उत्सव ,मिरवणुका
वाहन बंद पडल्याने
अपघात झाल्याने
व्हीआयपी मुव्हमेन्ट
सिग्नल बंद पडल्याने
इतर कारणे
एकुण २२७९ कारणांचा अभ्यास करण्यात आला
वाहतूक कोंडीची इतर ०२ कारणे
(रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे व मनोरुग्न महीला वाहनांवर दगड मारत असल्याने.)
वरील पैकी वाहतूक कोंडी टाळता न येणा-या कारणांपैकी १४७ ठिकाणी व उपक्रम / उत्सवांमुळे ४८ ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी अशा एकूण १९५ ठिकाणच्या वाहतूक कोंडी व्यक्तिरीक्त अन्य वाहतूक कोंडींच्या कारणांमध्ये वेळीच उपाययोजना केल्याने घट झाल्याचे दिसून येते.
६) नियमभंग करणा-या वाहन चालकांवर विशेष मोहिमे अंतर्गत गतवर्षीच्या ०३ महिन्याच्या तुलनेत पाच पट वाढ तर एकुण कारवाईत दुप्पट वाढ –
विशेष मोहिम
ड्रंक अॅण्ड ड्राइर्ल्ड, ट्रिपल सिट, राँग साईड, धोकादायक
ड्राईव्हिंग, जड वाहतूक
जानेवारी ते मार्च-२०२४- २,३५,२११
जानेवारी ते मार्च-२०२५- ४,४५,८१६
नोव्हेंबर, डिसेबर / २०२३ व नोव्हेंबर, डिसेंबर २०२४ ची तुलना केली असता वाहतूक कोंडी २१ टक्क्यांनी कमी झालेली आहे. तसेच सरासरी १० कि.मी. साठी लागणारा कालावधी २०२३ च्या तुलनेत १ मिनिटानी कमी झालेला आहे. सन २०२३ या वर्षामध्ये पुणेकरांना वार्षिक वाहतूकीचे तास १०९.४५ मिनिटे एवढे लागत होते ते सन २०२४ मध्ये १०८ तास, म्हणजेच १ तास ४५ मिनीटांनी सन २०२३ च्या तुलनेत कमी लागत आहे.
एकंदरीत वरील प्रमाणे केलेल्या उपाययोजनांमुळे माहे फेब्रुवारी व मार्च-२०२५ महिन्यांतील वाहतुकीच्या गतीची तुलना मागील वर्षाचे माहे ऑगस्ट-सप्टेंबर व डिरोबर-२०२४-जानेवारी २०२५ बरोबर करता, १०.४४ व ४.९३ टक्क्यांनी गतीमध्ये सुधार झालेचे दिसुन येते, पुणे शहर पोलीसांकडून करण्यात येणा-या उपाययोजनांमुळे वाहतूकीचे गतीमध्ये नियमीत सुधारणा होत असुन सरासरी १०.५ टक्यांनी गती वाढली असल्याचे दिसुन येत आहे.
(मनोज पाटील) अपर पोलीस आयुक्त
पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर