पुणे-नुकतीच पुण्यनगरी चे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळ आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंझाड यांच्यासह केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेतली. यावेळी बार असोसिएशनच्या वतीनं मेघवाल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.वकील संरक्षण कायदा देशभर लागू करा असे साकडे यावेळी पुणे बार असोसिएशन घातले शिवाय पुण्यातील नोटरीसंदर्भातील प्रलंबित विषयावरही यावेळी सकारात्मक चर्चा केली .
पुण्यात वाढलेली खटल्यांची संख्या वकिलांची संख्या त्या दृष्टीने करायच्या उपाययोजना या संदर्भात सविस्तर चर्चा या भेटीदरम्यान झाली. पुण्यनगरीचा खासदार या नात्याने शहरातील वकील व्यवसाय करणाऱ्या वकील बांधवांच्या दृष्टीने देखील दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने व्यवस्था इमारती बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर याबाबतीत सर्वतोपरी मदत करण्याचे यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मुरलीधर मोहोळ यांनी आश्वस्त केले.
देशभर वकिलांवर ती होत असलेल्या अत्याचार, मारहाण आणि अन्याय याला वाचा फोडण्यासाठी व केंद्राने वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा, पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे,तसेच भविष्यामध्ये पण एडवोकेट अमेंडमेंट अॅक्ट हे बिल वकिलांच्या हितासाठी विचार करून तयार करण्यात यावे व राज्यातील व पुणे शहरातील विविध नोटरींच्या समस्या संदर्भात व ज्युनियर वकिलांना राहण्यासाठी विविध योजना अंतर्गत घरे व स्टायपेंड पण मिळावे या सह इतर मागण्यांसाठी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड, रवींद्र शिंदे, पंकज महाजन यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत देशाचे कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांची दिल्लीमध्ये संसदेत प्रत्यक्ष भेट घेतली व त्याबाबतचे निवेदन कायदा मंत्र्यांना देण्यात आले.
कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लवकरात लवकर देशभर एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा लागू करण्यात येईल असे आश्वासन पुणे बार असोसिएशनला दिले तसेच विविध शासकीय योजनेअंतर्गत वकिलांना जास्तीत जास्त सवलती देण्याचे आश्वासन यावेळेस त्यांनी दिले तसेच एडवोकेट अमेंडमेंट बिल हे यापुढे देशभरातील सर्व बार असोसिएशन कडून सूचना मागवल्या नंतर लागू करण्यात येईल असेही आश्वासन दिले
वकील संरक्षण कायदा देशभर लागू करा- पुणे बार असोसिएशन चे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह कायदा मंत्र्यांना साकडे
Date: