पुणे-जबरीने मोबाईल हिसकावून लुटणा-या सराईतास पकडून पोलिसांनी त्याचाकडून ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत केले आहेत . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
फिर्यादी हे दि.२४/०३/२०२५ रोजी पहाटे ०३/२० वाजताचे सुमारास भाजी मंडई हडपसर पुणे येथे रिक्षाची वाट पाहत असताना दोन अनोळखी तरुणांनी मोटर सायकलवरुन येवुन फिर्यादी यांचे हातातील मोबाईल जबदरस्तीने हिसकावून नेल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.३२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५, डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, अमोल दणके, महाविर लोंढे यांचे पथक काम करीत असताना, तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे आरोपी विकास ऊर्फ आकाश सुरेश वाघीरे वय २१ वर्षे रा. मेट्रो स्टेशन, दळवी हॉस्पीटलजवळ, शिवाजीनगर पुणे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून त्यांनी गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरून नेलेला मोबाईल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी ही काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपी कडे अधिक तपास करता त्यांनी चंदननगर पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे गुन्हा करण्यासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडे केले तपासात त्यांचेकडून
१) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ३२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४),३(५) २) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं.१३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) ३) खडकी पोलीस स्टेशन गु.र.नं ३२६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच आरोपींकडून ३८ मोबाईल हस्तगत केले असून त्याचा तपास चालु आहे. आरोपींताकडून एकूण ३८ मोबाईल, ३ दुचाकी असा किं. रू ५,२०,०००/-चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त,मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन संजय मोगले, पोनि (गुन्हे) निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेड, पो. अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोढे, महेश चव्हाण, बापु लोणकर, यांचे पथकाने केली आहे.
जबरीने मोबाईल लुटणा-या सराईतास पकडून ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत
Date: