मुंबई-मुंबई-अधिवेशन संपल्यावर शिवसेनेचे भास्कर जाधव .. माध्यमांशी बोलताना काय म्हणाले…
“ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ज्यांना सत्तेची मस्ती, मुजोरी आहे त्यांच्याकडून लोकशाहीची इभ्रत राखणे, त्याची शान राखणे, लोकशाहीची सभ्यता राखणे, लोकशाहीचं संवर्धन करणे ही अपेक्षा नाही असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कडाडले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड न झाल्याने जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला.म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. ते संसदीय कार्यप्रणालीवर काम करणारे, प्रेम करणारे आहेत. आमची संख्या कमी जास्त विचार करणार नाही असं ते सातत्याने बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते सूतोवाच असतील असं मला वाटत होते. परंतु या लोकांचा संसदीय कार्यप्रणाली, घटनेवर विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्याकडे आहे असं त्यांनी सांगितले.तसेच विधानसभा अधिनियमाला जसे सदस्य बांधील आहेत तसे अध्यक्षही बांधील आहेत. अध्यक्षांनी वाट्टेल तो निर्णय घ्यायचा असं नाही. सभागृहातील प्रथा, परंपरा, नियमांप्रमाणे अध्यक्षांनी वागावे. घटनात्मक अधिकार प्रत्येकाला दिले आहेत. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट चुकीची केली नाही. यांना घटनाच मान्य नाही, लोकशाही मान्य नाही. विधिमंडळ मान्य नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला..दरम्यान, विरोधी पक्षनेते खुर्ची रिकामी ठेवली काय किंवा पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय..सध्या तेच सुरू आहे