पुणे:भरचौकात अलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर न्यायालयाने दिलासा दिला आहे. भारत देश सोडून जायचे नाही. दर सोमवारी ११ ते २ यावेळेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावायची अशा अटी शर्तींवर एन.एस बारी कोर्टाने आहुजाला जामीन मंजूर केला.
न्यायालयाने आहुजाच्या वडिलांना मुलाला समजावून सांगावे असे तोंडी सांगितले.
मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा (वय 25) या तरूणानं भर चौकात कार थांबवून लघुशंका केली होती. तसंच अश्लील कृत्य केलं होतं. येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्यानंतर दोघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र गौरव आहुजा याने केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी येरवडा पोलिसांनी मुदतवाढीची दोनदा मागणी केली त्यामुळे आहुजा चा पोलीस कोठडीमधील मुक्काम वाढला. बुधवारी ( दि. २५) आहुजा यांचे वकील ऍड रमेश परमार व ऍड सुरेंद्र आसुणे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की आहुजा ने केलेल्या कृत्याला महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट चा कायदा लागू होत नाही तसेच त्याच्यावर लावण्यात आलेली सर्व कलमे ही जामीनपात्र आहेत. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आहुजा याला सशर्त जामीन मंजूर केला.