Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्र सरकारच्या ‘NAMASTE’ योजनेची अंमलबजावणी करणारे पुणे ठरले देशातील पहिले शहर

Date:

पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ कडून कचरा वेचकांच्या नोंदणीस सुरुवात

पुणे, २६ मार्च २०२५: देशातील कचरा वेचकांना सामाजिक आणि आर्थिक सन्मान मिळावा, त्यांचे जीवनमान उंचावे आणि त्यांना सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘NAMASTE’ (National Action for Mechanized Sanitation Ecosystem) योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात पुण्यापासून करण्यात आली. केंद्र सरकारतर्फे अधिकृत नोंदणी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे या योजनेद्वारे कचरा वेचकांना मिळतील. यासाठी स्वच्छ संस्था, पुणे महानगरपालिका आणि कष्टकरी पंचायत यांनी पुढाकार घेत पुण्यातील नोंदणी शिबिरास आज सुरुवात केली.

कचरा वेचकांना आणि त्यांच्या कामाला नसलेली ओळख, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा आभावाने मिळणारा लाभ यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. NAMASTE योजना हे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे आणि असंघटित कचरा वेचकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहात (SWM) समावेशासाठी सक्ती करते. हा महत्त्वाचा टप्पा कचरा वेचकांच्या अदृश्य परंतु अमूल्य योगदानाची अधिकृतपणे दखल घेईल आणि त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविकेसाठी सक्षम करेल.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) मार्फत या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. अर्बन मॅनेजमेंट सेंटर (UMC) आणि UNDP हे या उपक्रमाला तांत्रिक सहाय्य करत आहेत.

पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्थेचा पुढाकार
NAMASTE योजनेची अंमलबजावणी करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे. महापालिकेच्या पुढाकारामुळे ‘स्वच्छ (SWaCH) आणि कष्टकरी पंचायत’ यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने कचरा वेचकांना औपचारिकरित्या घनकचरा व्यवस्थापनात सामील करून त्यांना सन्मानजनक व सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा म्हणून, २६ मार्च २०२५ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

या कार्यक्रमाचे उद्घाटन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि उपायुक्त श्री. संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप आणि मुकुंद बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कष्टकरी पंचायतचे आदित्य व्यास यांनी केले.

स्वच्छ संस्थेच्या सहकार्याने पुणे महानगरपालिकेने कचरा वेचकांना घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यामध्ये देशात पुढाकार घेतला. मागील २० वर्षांच्या या भागीदारीची दखल घेत केंद्र सरकारच्या NAMASTE योजनेची आज पुण्यात सर्वप्रथम सुरूवात झाली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. या एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमधून इतर शहरांना देखील प्रेरणा मिळेल. ‘NAMASTE’ सारख्या उपक्रमांद्वारे कचरा वेचकांसोबतची आमची भागीदारी आणखी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील” – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी

“मागील ३० वर्षांत पुण्यातील कचरावेचकांनी संघर्ष करून ओळखपत्र आणि इतर कामगारांप्रमाणे सरकारी योजनांचा हक्क मिळवला. पुणे महानगरपालिकेसोबत काम करताना आम्हाला व आमच्या कामाला मान्यता मिळाली, आणि आता NAMASTE योजनेद्वारे केंद्र सरकारमार्फत आमची कामगार म्हणून अधिकृत नोंदणी होत आहे. हे आमचा आत्मसन्मान उंचावण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,” अशा भावना स्वच्छ च्या कचरा वेचक प्रतिनिधी सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.

‘NAMASTE Waste Picker Portal’ आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आज ५० हून अधिक कचरा वेचकांची नोंदणी करण्यात आली. यापुढेही कचरा वेचकांची नोंदणी नियमितपणे सुरू राहणार आहे. कचरा वेचकांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक रोजगाराचा मार्ग या योजने अंतर्गत त्यांना प्राप्त होणार आहे. कचरा वेचक हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार आहेत, मात्र आजवर त्यांना अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. NAMASTE योजनेमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा, तसेच पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या उपक्रमामुळे शहराची स्वच्छता अधिक सक्षम होईल आणि कचरा वेचकांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...