पुणे- पोलिसांना दोघे जन नंबर प्लेट नसलेल्या बाईक वरून गेल्याची माहिती एकाने पोलिसांना दिली , पोलिसांनी माग काढला आणि त्यांना पकडले अन ते निघाले बाईक चोर , या दोघा चोरट्यांकडून ३ बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर, गुन्हा रजि नं ८४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात गोपीनाथ नगर कोथरुड पुणे येथील दत्त मंदीराचे समोरुन मोपड चोरी झालेबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यायातील चोरीस गेलेली मोपडेचा व अज्ञात चोरट्यांचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे दि.२३/०३/२०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस अमंलदार योगेश सुळ व हनुमंत माळी असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शास्त्रीनगर पोलीस चौकीचे चौकी अमंलदार योगेश सुळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेघसृष्टी गोपनाथ नगर कोथरुड परीसरात दोन अनोळखी इसम हे संशयीतरीत्या एका काळ्या रंगाच्या बिगर नंबर प्लेटचे अॅक्टीव्हा स्कुटरवर फिरत आहेत. सदरच्या माहिती प्रमाणे मेघसृष्टी गोपीनाथनगर, कोथरुड येथे दोन अनोळखी इसम बिगर नंबर प्लेटचे अॅक्टीव्हा गाडीवर फिरताना मिळुन आले. सदर इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) आकाश सुरेश वाघिरे वय २१ वर्षे, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ कोकांडे वस्ती शिवमंदीरा जवळ शिवाजीनगर पुणे २) आदित्य भारत जाधव वय २१ वर्षे रा. मनोहर क्लासिक बिल्डींग फ्लॅट नं.१०, तिसरा माळा चंदननगर खराडी पुणे अशी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचेकडील मिळुन आलेली अॅक्टीव्हा स्कुटरचे मालकी हक्काबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची माहिती दिली त्यामुळे त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारले असता त्यांनी सदरची अॅक्टीव्हा ही बालाजीनगर, भारती विद्यापीठ कात्रज पुणे येथुन चोरी केल्याचे कबुल केले म्हणुन त्यांना लागलीच कोथरुड पोलीस ठाणेत आणुन त्यांचेकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन मोटर सायकली चोरी केल्याचे कबुल केले व सदर मोटर सायकली ह्या काढुन दिले आहेत. तपासादरम्यान आरोपीचे ताब्यातून एकूण ८४,०००/- रु. कि.च्या तीन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या आरोपींनी कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं.८४/२०२५, लोणी काळभोर पोलीस ठाणे गु.र.नं.१२६/२०२५ व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं.१७६/२०२५ मधील मोटर सायकल चोरीचे तीन गुन्हे कोथरुड पोलीस ठाणे पुणे शहर पोलीसांनी उघड केले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परि ३ श्री. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, भाऊसाहेब पठारे यांचे मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस उप निरीक्षक बसवराज माळी, पोलीस अमंलदार योगेश सुळ, हनुमंत माळी यांचे पथकाने केली आहे.

