पुणे-स्वताच्या मावशीच्या घरी चोरी केली खरी त्याने , पण पुणे पोलिसांनी त्याला अवघ्या ३ तासात हुडकला आणि १ लाख २२ हजाराच्या चोरीच्या मुद्देमालासह गजाआड केला .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’फिर्यादी मावशी या ह्या त्यांचे राहते घराचा दरवाजा ओढुन घेवुन त्यांचे मुलीच्या घरी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा १,२२,०००/- चा ऐवज चोरून नेला म्हणुन यातील त्यांनी लष्कर पोलीस स्टेशन, येथे तक्रार दिल्याने अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा रजिस्टर क्र. ५३/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना, फिर्यादी यांचे घराजवळील बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी किरण राजेश कुंटे वय २८ वर्षे धोबी घाट कॅम्प पुणे याच्याकडे त्यास विश्वासात घेवुन तपास केला .. तेव्हा त्याने त्याची मावशी फिर्यादी यांच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने आला असता, त्याला त्याच्या मावशीचे घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. त्याने गुपचुप चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट उघडुन त्याच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले वरीलप्रमाणे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,०००/-रू. चोरल्याने तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडुन चोरी केलेली सर्व सोन्याचे दागिने रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उप आयुक्त, परि-२, श्रीमती स्मार्तना पाटील , सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग दिपक निकम, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकगिरीश कुमार दिगांवकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे), प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, लोकेश कदम, सागर हराळ, महिला पोलीस अंमलदार अलका ब्राम्हणे यांनी केली आहे.

