पुणे- खडकी पोलीस स्टेशन च्या हद्दीत खडकी बाजारातील महालक्ष्मी ज्वेलर्स येथे विना नंबर ची स्कूटर घेऊन तोंडास रुमाल लावून आलेल्या दोघांनी एकाच्या हातातील १० लाखाची रोकड हिसकावून पोबारा तर केला. पण … पुणे पोलिसांनी त्यांना ६ तासात हुडकून हि रोकड आणि स्कूटर सह या दोघा भामट्यांना गजा आड केले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’.२५/०३/२०२५ रोजी खडकी पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मी ज्वेलर्स, खडकी बाजार, येथे फिर्यादी यांचे हातातील १०,००,०००/- रु ची रोकड असलेली बॅग…. पाठीमागे व पुढे नंबर प्लेट न लावलेल्या व्हेस्पा कंपनीचे मोटर स्कुटरवरुन आलेल्या व तोंडास रुमाल बांधलेल्या चोरट्यांनी रोकड असलेली पिशवी जबरीने हिसकावुन खडकी बाजारातुन अज्ञात ठिकाणी पलायन केले होते.
ही माहीती मिळताच सदर ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवुन सदर घटनेचे तपासाबाबत मार्गदर्शन केले. चोरट्यांच्या विरोधात खडकी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीच्या बी.एन.एस. कलम. ३०९ (४) प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास चालु करण्यात आला .
खडकी पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले, व स्टाफ यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करुन तांत्रीक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे अनोळखी आरोपीचा गुन्हा करण्यापुर्वीचा माग काढुन ०६ तासाचे आत चाकण, पुणे येथुन यातील आरोपी चेतन मंगेश गोडसे, वय २८ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे, आणि आकाश कैलास माळी, वय २५ वर्षे, रा.चक्रपाणी वसाहत, भोसरी, यांना गुन्ह्यातील जबरीने चोरण्यात आलेले रु. १० लाख रु रोकडसह व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील,पोलीस उप आयुक्त परि.४, हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभागविठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांचे मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गजानन चोरमले, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस अंमलदार संदेश निकाळजे, आशिष पवार, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड सुधाकर तागड, दिनेश भोये, शशांक डोगरे, प्रताप केदारी, यांनी केली आहे.
१० लाखाची रोकड जबरीने हिसकावुन पळाले पण .. पोलिसांनी ६ तासात पकडले
Date:

