मुंबई: गोदरेज एन्टरप्राइजेस समूहाच्या बांधकाम व्यवसायाने मुंबईच्या अंतर्गत शहर
वाहतूक नेटवर्कच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कंपनीने Temporary Access
Bridge (TAB) साठी 3,500 हून अधिक प्रीकास्ट काँक्रीट सॅक्रिफिशियल स्लॅब आणि सॅक्रिफिशियल
फॉर्मवर्कसाठी 500 प्रीकास्ट काँक्रीट टब घटकांचे उत्पादन आणि पुरवठा केला आहे. प्रत्येक प्रीकास्ट काँक्रीट
सॅक्रिफिशियल स्लॅब उच्च सामर्थ्य आणि टिकाऊपणाच्या मानकांनुसार डिझाइन करण्यात आले आहे.
या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी गोदरेजच्या नाविन्यपूर्ण आणि शाश्वत
उपाय सुविधांवरील विश्वासार्ह कौशल्य दिसून येते. मुख्य अभियांत्रिकी प्रक्रियेत पर्यावरणपूरक पद्धतींचा
समावेश करून गोदरेज भारताच्या शहरी भविष्याला प्रगती आणि पर्यावरणीय जबाबदारी यांच्यात
समतोल साधणाऱ्या शाश्वत पर्यायांनी आकार देत आहे.
गोदरेज एन्टरप्राइजेस ग्रुपच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनुप
मॅथ्यू म्हणाले, “आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत बांधकाम उपायांसह भारताच्या पायाभूत सुविधांच्या
विकासाला गती देण्यासाठी वचनबद्ध आहोत. पर्यावरणावर कमी परिणामकारक बांधकाम साहित्य आणि
चक्रिय बांधकाम पद्धती अंगीकारून आम्ही भारताच्या हरित पायाभूत सुविधांच्या विकासाच्या भविष्यात
महत्त्वपूर्ण योगदान देत आहोत. आमच्या वर्सोवा-बांद्रा सी लिंक प्रकल्पातील सहभागामुळे या बांधिलकीला
बळकटी मिळाली आहे. अधिक टिकाऊ बांधकाम साहित्य आणि स्त्रोत कार्यक्षम प्रक्रिया वापरून, आम्ही
प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभावात घट करत आहोत. तसेच संरचनात्मक मजबुती आणि इच्छित टिकाऊपणा
सुनिश्चित करत आहोत. आपल्या अभियांत्रिकी उपायांच्या केंद्रस्थानी शाश्वततेला स्थान देत भारताच्या
पायाभूत सुविधा विकासासाठी असलेली बांधिलकी गोदरेज किती जबाबदारीने पार पाडत आहे हे यातून
अधोरेखित होते.”
गोदरेजच्या प्रीकास्ट काँक्रीट घटकांमध्ये 10% Recycled Concrete Aggregates (RCA) चा वापर
समाविष्ट असून हे काँक्रीट मिक्स डिझाईन विक्रोळी मुंबई येथील अत्याधुनिक काँक्रीट कचरा पुनर्वापर
सुविधाकेंद्र येथे तयार केले जाते. संपूर्णपणे हरित ऊर्जा वापरून चालवल्या जाणाऱ्या या सुविधा केंद्राने
आपल्या प्रगत उत्पादन कार्यक्षमता आणि पर्यावरणीय मानकांसाठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल
(IGBC) ‘ग्रीनको गोल्ड’ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. गोदरेज बांधकाम आणि ते पाडून झालेल्या कचऱ्याचे
मौल्यवान इमारती आणि बांधकाम साहित्यामध्ये रूपांतर करून गोदरेज स्थावर मालमत्ता आणि बांधकाम
क्षेत्रात चक्रिय अर्थव्यवस्थेला चालना देत आहे.
या प्रकल्पातून शाश्वत बांधकाम साहित्य वापरण्यात असलेली गोदरेजची अग्रेसरता दिसून येते. त्यामुळे
कंपनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एक विश्वासार्ह भागीदार ठरली आहे. स्थावर मालमत्ता आणि
बांधकाम क्षेत्रावर पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याचा दबाव वाढत असताना, गोदरेज नाविन्य, कार्यक्षमता
आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल राखण्याचे नवे मापदंड निर्माण करत आहे. जबाबदार
पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्याने भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला योग्य दिशेने गती मिळू
शकते हे गोदरेजने सिद्ध केले आहे.
वर्सोवा-बांद्रा सी लिंक साठी शाश्वत टिकाऊ उपायांसह;गोदरेजने बळकटी दिली मुंबईच्या पायाभूत सुविधांना
Date:

