बांधकाम परवान्यासाठी 10 लाखांच्या लाचेची मागणी:चौघांवर गुन्हा दाखल

Date:

पुणे-बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून ५ लाखांचा पहिला हप्ता घेताना सहाय्यक नगररचनाकारांसह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. याप्रकरणी तात्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारेंसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्हा प्रशासनासह कराड नगरपालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बांधकाम व्यावसायिक असलेल्या तक्रारदाराचे कराड शहरात पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. त्यांनी बांधकाम परवानगीसाठी २०१७ मध्ये कराड नगरपालिकेत अर्ज केला होता. नियमावलीतील बदलाप्रमाणे सुधारित बांधकाम परवानगीसाठी २०२३ मध्ये पुन्हा अर्ज केला होता. यादरम्यान सहाय्यक नगर रचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांनी खासगी इसम अजिंक्य देव याच्या समवेत तक्रार दाराची भेट घेत बांधकामात दोन हजार स्क्वेअर फूट वाढीव एफएसआय असल्याचं सांगून बाजारभावाप्रमाणे मिळकतीच्या ८० लाखांपैकी दहा ते बारा टक्के म्हणजेच १० लाख रुपयांच्या रकमेची मागणी पंचासमक्ष केली होती.

नुकतीच बदली झालेले तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, पालिका कर्मचारी तौफिक शेख आणि खाजगी इसम अजिंक्य देव यांनी संगनमताने तक्रार दाराकडे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याची तक्रार दाखल होताच सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, विक्रमसिंह कणसे यांनी सोमवारी (२४ मार्च) कराड येथे सापळा रचून पाच लाखांचा पहिला हप्ता घेताना पालिका कर्मचारी तौफिक शेख याला रंगेहाथ पकडलं.

नुकतीच बदली झालेले कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, तौफिक शेख व खासगी इसम अजिंक्य देव यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यप्रकरणी सातारा एसीबीने सहाय्यक रचनाकार स्वानंद शिरगुप्पे आणि तौफिक शेख याला ताब्यात घेतलं आहे.

नगरपालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर तक्रारी केल्या होत्या. तसेच त्यांच्या बदली चीही मागणी करण्यात आली होती. पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या पासूनच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल माजी नगरसेवकांमध्ये नाराजी आणि तक्रारीचा सूर होता. कडक शिस्तीचे असल्याचा दिखावा ते करत होते. मात्र, एसीबीच्या कारवाईने त्यांच्या दिखाऊ शिस्तीचा फुगा अखेर फुटला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुणाल हा अतिरेकी,देशद्राही आहे का? शिंदे गट त्याचा खून करणार का? महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवता ? संजय राऊतांचे सवाल

मुंबई-महाराष्ट्रात एकप्रकारे गुजरात किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न राबवला जात...

२०२५ चे पहिले सूर्यग्रहण आज …

नासाच्या मते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो...