पुणे-शिवाजीनगर परिसरात एका चाैकात सिग्नलला डस्टबीन पेपर विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना आेळखीतील दोन मुलांनी गाडीवर बसवून घरी घेऊन जात एक दिवस घरी ठेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या दोन आईंवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.
संबंधित मुली या शिवाजीनगर भागात एके ठिकाणी डस्टबीन पेपर, प्लॅस्टीक बॅग विक्रीचा व्यवसाय कुटुंबासह करतात आणि फुटपाथवरच रहातात. तर आरोपी मुले हे दुसऱ्या एका जागी फुलविक्री करुन रस्त्यावरच रहातात. पीडित मुलींची एक बहिण ही आरोपीच्या नातलगास दिली असल्याने ते एकमेकांचे ओळखीचे आहे. आरोपी मुले हे एकमेकांचे भाऊ असून त्यांचे आई वेगवेगळया असल्या तरी त्यांचे वडील एकच आहे. एकमेकांच्या जवळच ते रहाण्यास आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, १७ मार्च राेजी सदर दोन अल्पवयीन मुले ही त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ आली व त्यांनी सदर दोघींना बहिणीशी भेट घालून देताे असे सांगून दोघींना फुस लावून गाडीवर घेऊन गेले. तेथे आरोपींची आई देखील उपस्थित हाेती. त्यांना पीडित मुलींनी पुन्हा घरी सोडण्याकरिता विनंती केली परंतु त्यांनी त्यांचे ऐकले नाही. त्या एक दिवस राहिल्यावर दोन्ही मुलांनी दोघींवर वेगवेगळया खाेलीत नेऊन शारिरिक संबंध केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत म्हणाले, पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तांत्रिक मुद्दयाचे आधारे हा गुन्हा घडला आहे का? याबाबत देखील पोलिस गांभीर्याने तपास करत आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक एस हिरे याप्रकरणी पुढील तपास करत आहे.