पीडित व्यक्ती परिसरातील वक्फ जमिनीच्या विरोधात कायदेशीर खटल्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होता
या संदर्भात आयोगाने राज्याचे पोलिस महासंचालक आणि तिरुनेलवेलीचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत तपशीलवार अहवाल मागवला
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची चार जणांच्या गटाने दिवसाढवळ्या हत्या केल्याच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC),स्वतःहून दखल घेतली आहे. वृत्तानुसार,पीडित व्यक्ती परिसरातील वक्फ जमिनीच्या अतिक्रमणाविरुद्ध कायदेशीर खटले लढणारा कार्यकर्ता होता आणि त्यांना काही लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.या बाबतच्या तक्ररीवर पोलिस त्यांच्यावर योग्य कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
प्रसारित झालेल्या बातम्या सत्य असल्यास पीडिताच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदविले आहे. त्यामुळे तामिळनाडूचे पोलीस महासंचालक आणि तिरुनेलवेलीचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल आयोगाने मागवला आहे.

