– विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांची लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर
पुणे : सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड बैठक येत्या पंधरा दिवसात घेण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधीमंडळात दिली.
सिंहगड किल्ल्याची सध्या दूरवस्था आहे, तेथे हजारो पर्यटक दररोज येतात मात्र त्यांच्यासाठी चालण्यासाठी रस्ता सुध्दा नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी विकास आराखडा कधी होणार आहे?
किल्ल्यावर एकत्रित मालकी असलेल्या पुरातत्व विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रित बैठक कधी होईल असा प्रश्न खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधीमध्ये मांडला.
आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की, तापकीर यांनी मांडलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहेच. सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्यासंदर्भात पुरातत्व, वन, सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हाधिकारी या चार विभागाची एकत्रती मालकी आहे आणि त्यांच्यी त्या चारही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली होणे गरजेचे आहे. त्याबाबत येत्या पंधरा दिवसांमध्ये ही बैठीक होईल असे नियोजन केले जाईल.
आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सहा कोटींची वर्क ऑर्डर निघाली असल्याची माहिती दिली. या सहा कोटींमधून राजाराम महाराज समाधी परिसर, वाडा संवर्धन, कंत्राटीपध्दतीवर स्वच्छतागृह बांधकाम व देखरेख, कल्याण दरवाजा दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश आहे.यातील काही कामे सुरु झाली आहे तर काही लवकरच सुरु होतील असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.